नागपूर प्रतिनिधी तेज न्यूज
नागपूर येथे रेशीम बाग मैदानावर वरील आयोजित करण्यात आलेल्या संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व संमेलनाला देश विदेशातील शिंपी समाज बांधवांनी आपली उपस्थिती दर्शवली. संत नामदेव महाराजांनी सामाजिक एकात्मतेचा संदेश देत समाजात एकि निर्माण व्हावी असा विचार मांडला असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. रेशीम बाग मैदानावरील राष्ट्रीय एकात्मता विश्व संमेलन आयोजित करण्यात आले होते.
या विश्व महासंमेलनात केंद्रीय मंत्री गडकरी यांना संत नामदेव महाराज विश्व पुरस्कार प्रदान करण्यात आला. या भव्य कार्यक्रमाला संत नामदेव महाराजांचे विठ्ठल महाराज श्री देवनाथ मठाचे पिठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज, सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज, अभिनेते गोविंद नामदेव, मुख्य संयोजक ईश्वर धिरडे, भास्कर टोम्पे, अनंत जांगजोड, यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी गडकरी म्हणाले संत महाराजांच्या राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन नागपुरात होत आहे यांचा मला आनंद आहे संत नामदेव महाराज यांनी संपूर्ण देशात समाज प्रबोधनाचे कार्य केले. नामदेव महाराजांनी विषमता दूर होऊन समाजात एकी निर्माण व्हावी असा संदेश दिला त्यांच्या विचारांनी अनेकाचे जीवन बदलले असे यावेळी गडकरी यांनी म्हणाले.
या कार्यक्रमातील निनि येणाऱ्या संपूर्ण राज्यातील शिंपी समाज बांधवाची अतिशय व्यवस्थितपणे जिल्हा समितीचे अध्यक्ष अवी ताठे, सुधामा कीन गचके व इतर पदाधिकाऱ्यांनी व्यवस्था केली.


