भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम तेज न्यूज
मुंबई कांदिवली पश्चिम येथील जेष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांच्या 'सुख शोधता शोधता..' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आळंदीत होणार असल्याचे के.एस.आय.पब्लिकेशन आयोजित ३० व्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलन आयोजक विलास पाटील यांनी सांगितले आहे. रविवार दिनांक २३ आगस्ट २०२६ रोजी सकाळी ११वाजता तिर्थक्षेत्र आळंदी येथे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात भारत कवितके यांच्या काव्य संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
भारत कवितके यांचे हे अकरावे पुस्तक प्रकाशित होत आहे.विविध विषयावर विविध आशयावर भावगीत, आध्यात्मिक, वस्तू निष्ठ, व्यक्ती निष्ठ निसर्गिक कविता असलेला सुख शोधता शोधता हा काव्यसंग्रह वाचकांना नक्कीच आवडेल, असे भारत कवितके यांनी सांगितले.आजच्या धकाधकीच्या जीवनात व मिडियाच्या जाळ्यात गुरफटलेल्या रसिकांना हा छोटासा ६० पेज व अत्यंत कमी किमतीत म्हणजे १२०/ रुपये काव्यसंग्रह नक्कीच आकर्षीत करेल, असे साहित्य संमेलनाचे आयोजक विलास पाटील यांनी सांगितले.
तर साहित्य संमेलनाच्या प्रमुख पाहुणे सुमन देसाई यांनी सांगितले की," कवी भारत कवितके यांचे साहित्य वाचनीय असते, पत्रकार म्हणून ते सामाजिक समस्यांवर वृत्तपत्रातून सातत्याने आवाज उठवितात, शासनाच्या दरबारी जनसामान्यांच्या समस्या मांडण्यासाठी सतत धडपड करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत.त्यांच्या सुख शोधता शोधता या काव्य संग्रहास शुभेच्छा.'आणि साहित्य संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक दशरथ धायगुडे यांनी सांगितले की,' साहित्य क्षेत्रात हा काव्यसंग्रह नक्कीच मोलाची भर टाकेलं,यात शंका नाही, यातील कविता वाचकांना नक्कीच आवडतील.'या साहित्य संमेलनात पुस्तक प्रकाशन सोहळा, पुरस्कार सोहळा,व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.
या प्रसंगी दशरथ धायगुडे,सुमन देसाई, आचार्य प्रा.सी.ए.डाॅ.शंकर घनश्याम अंदानी, माया नवथर,विणा वेणूमाधव केरकलमट्टी, विलास पाटील कवी इंगळी सरकार, विकास पालवे, राजेंद्र फड, चित्रा दिक्षीत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या काव्य संग्रहाची प्रस्तावना मनोहर भोसले यांनी अत्यंत मनमोकळेपणाने लिहिली आहे,तर संपादक नागेशजी हुलवळे, शिक्षिका ऐश्वर्या कांबळे, संपादिका व साहित्यिका सुप्रिया जाधव यांनी भारत कवितके यांचे अभिनंदन करून साहित्यिक क्षेत्रात साठी शुभेच्छा दिल्या व सूत्रसंचालनाची जबाबदारी वाडेकर आणि सुनिता क्षीरसागर सांभाळणार आहेत.

