सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
आजच्या स्पर्धात्मक तंत्रज्ञान युगात केवळ पदवी नव्हे, तर प्रत्यक्ष कौशल्ये महत्त्वाची ठरत आहेत. याच पार्श्वभूमीवर फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला महाविद्यालयात संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभाग आणि प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागाच्या संयुक्त विद्यमाने द्वितीय वर्ष बी.टेक. (कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग) विद्यार्थ्यांसाठी ४ ते १४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत 'सी प्लस प्लस आणि डीबीएमएस' या विषयावरील दहा दिवसीय व्हॅल्यू ॲडेडशन प्रशिक्षण कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. रविंद्र शेंडगे यांनी दिली.
विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रात आवश्यक असलेली प्रोग्रामिंग कौशल्ये, तांत्रिक आत्मविश्वास आणि रोजगाराभिमुख तयारी घडविण्याच्या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी ॲस्पायरिंग करिअर्स, पुणे या नामांकित प्रशिक्षण संस्थेचे अनुभवी प्रशिक्षक सुशांत पिंगळे आणि मानव भारतीया विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
सी प्लस प्लस, जावा फुल स्टॅक, पायथन, डाटा सायन्स आणि ए आय/एम एल यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानातील त्यांचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे ठरणार आहे.
प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना सी प्रोग्रामिंग मधील मूलभूत संकल्पना, प्रोग्रामची रचना, डेटा टाइप्स, व्हेरिएबल्स, इनपुट-आउटपुट स्टेटमेंट्स तसेच प्रोग्रामिंगमधील मूलभूत तत्त्वांचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्यक्ष उदाहरणे, प्रात्यक्षिके आणि संवादात्मक पद्धतीमुळे विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणात सक्रिय सहभाग नोंदवत विविध शंकांचे निरसन करून संकल्पना सहज आत्मसात केल्या.
या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट, इंटर्नशिप, तांत्रिक मुलाखती तसेच उद्योगक्षेत्रातील प्रत्यक्ष कामकाजासाठी आवश्यक असलेली प्रोग्रामिंग कौशल्ये विकसित करण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केला.
हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र शेंडगे, उपप्राचार्या डॉ. विद्याराणी क्षीरसागर, काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ. तृप्ती बनसोडे, प्लेसमेंट ऑफिसर प्रा. धनंजय शिवपुजे, प्लेसमेंट समन्वयक प्रा. ऋषिकेश पाटील आदींसह शैक्षणिक समन्वयक प्रा. माधुरी सुरवसे यांचे मार्गदर्शन लाभले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फॅबटेक महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग परीश्रम घेत आहेत

