पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
स्वेरीमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फाऊंड्रीमेन, पुणे चॅप्टर अंतर्गत स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक), पंढरपूर आणि इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फाऊंड्रीमेन यांच्या समन्वयातून स्टुडंट चॅप्टरचे नुकतेच उदघाटन करण्यात आले.
या समारंभाच्या अनुषंगाने इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फाऊंड्रीमेन, पुणे चॅप्टरचे चेअरमन अजय येवले, व्हाईस चेअरमन शिरीष पिंगळे, सचिव उत्तम सिन्हा तसेच ट्रेझरर मनीष आराध्ये यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. या समारंभास इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फाऊंड्रीमेन, पुणे चॅप्टरचे कौन्सिल सदस्य रमेश आंबेगावकर, मनीष बधोनिया, संजय मुनफण, माजी संचालक सतीश सोनी, माजी चेअरमन रामचंद्र धुमाळ व मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख अविनाश सपकाळ हे ही उपस्थित होते.
स्टुडंट चॅप्टर स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक),च्या वतीने प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, समन्वयक प्रा. एन. बी. जाधव, चेअरमन वैष्णवी नवले, व्हाईस चेअरमन शिवतेज जाधव, सेक्रेटरी रोशनी सुरवसे व ट्रेझरर अतुल सरडे आदी उपस्थित होते.
या उद्घाटन प्रसंगी वरील सर्व मान्यवरांनी स्टुडंट चॅप्टर स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक), पंढरपूरच्या विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. प्रा. यादव पनसवाड यांनी सूत्रसंचालन केले तर विद्यार्थिनी सचिवा वैष्णवी नवले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

