पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित उमा शिक्षण संकुलातील उमा महाविद्यालय व उमा शिक्षण शास्त्र महाविद्यालय पंढरपूरचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कथाकथनकार जयवंत आवटे यांच्या शुभहस्ते व संस्थेचे उपाध्यक्ष मुकुंदराव परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली तसेच अभिनव भित्तिपत्रकाच्या अंकाचे प्रकाशन प्रमुख पाहुणे व संस्थेचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जयवंत आवटे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, "कॉलेज जीवन म्हणजे सळसळत्या रक्ताचा सप्तरंगी आविष्कार आहे या वयात ध्येयासाठी झुंजणारी, तत्त्वासाठी लढणारी मने असतात.हे दिवस उल्हासाचे, उत्साहाचे, उन्मेशाचे असतात त्यामुळे या वयातच तुमची ध्येय निश्चित करा व त्या दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न करा. तेव्हा तुम्ही जीवनात आपोआप यशस्वी व्हाल असे प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी "जाणती" या कथेचे आपल्या अनोख्या शैलीतून सादरीकरण केले. श्रोत्यांना हसता हसता अंतर्मुख होऊन विचार प्रवृत्त केले.
"या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष मुकुंदरावजी परिचारक यांनी"बक्षीस पात्र सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारचे उत्तरोत्तर यश संपादन करावे अशा शुभेच्छा दिल्या व मोठ्या मालकांनी ज्या हेतूने हे महाविद्यालय उभारले आहे तो हेतू सफल करावा असे विचार विशद केले."या कार्यक्रमामध्ये उमा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धीरजकुमार बाड व उमा शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. बागवान जे एस यांनी वार्षिक अहवाल वाचनातून महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीचा आढावा घेतला. विद्यापीठ परीक्षेत आणि क्रीडा यामध्ये सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव राजगोपाल भट्टड, खजिनदार रमेश लाड,उमा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, संस्थेचे विश्वस्त डॉ. मिलिंद परिचारक, माजी प्रभारी प्राचार्य पवार एम एस, याबरोबरच उमा शिक्षण संकुलातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अनंत कुलकर्णी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ.सर्वगोड नागिन यांनी करून दिला.सूत्रसंचालन प्रा. सविता दूधभाते व प्रा.डॉ.दत्ता सरगर यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा.संध्या सावकार यांनी मानले.

