जोगेश्वरी पूर्व गणेश हिरवे
शिवसेनेचे खासदार रविंद्र वायकर व मनिषा वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच शिवसेना उद्योग व रोजगार विकास मंचचे अध्यक्ष शैलेश जायसवाल यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दिनांक १५ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ३.०० ते ६.०० श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर परिसर, श्यामनगर तलाव, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड, जोगेश्वरी पूर्व येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित केला आहे.
बेरोजगारीच्या अंधारातून यशाच्या प्रकाशाकडे जाण्यासाठी या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आयोजकांनी जनतेला आवाहन केले आहे. उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
१. बायोडाटाच्या किमान ५ प्रती सोबत आणाव्यात.
२. आधार कार्ड व शैक्षणिक/व्यावसायिक प्रमाणपत्रांच्या सत्यप्रति.
३. नोकरीसाठी पात्रता सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.अधिक माहितीसाठी पुढील मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा.
9221112000,9221114000,9221116000