मनुष्याने जीभ जिंकली तर त्याचे अर्धै आयुष्य जिंकल्याचे फळ प्राप्त होते
ज्याप्रमाणे मनाची जडणघडण होते त्याप्रमाणे आयुष्यात सुखशांती यश प्राप्त होते
करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
श्री चौंडेश्वरी पौष पौर्णिमा उत्सव करकंब येथे प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या नारदीय कीर्तन महोत्सवात आज पाचवे कीर्तन पुष्प राष्ट्रीय कीर्तनकार नम्रताताई व्यास -निमकर यांनी गुंफत असताना सांगितले. सुरुवातीला श्री चौंडेश्वरी मातेचे पूजन आणि दीपप्रज्वलन नम्रताताई व्यास निमकर.संतोष पिंपळे.गंगाधर देव सौ.व श्री किरण काळे सौ.व श्री मिलिंद देशपांडे सुदर्शन दुधाणे ज्ञानेश्वर दुधाणे यांचे शुभहस्ते झाले.त्यानंतर कीर्तनाला सुरुवात झाली.
पूर्वरंगामध्ये नम्रताताईनी किती रे घेशील धाव मना या नरहरी महाराजांच्या पदावर निरुपण करताना सांगितले की मनुष्य जन्म घेतो आणि मरण पावतो यामधील आयुष्य कसं जगला आणि कर्म काय केलं त्यावरून त्यांचे नाव हेच कायम टिकते.त्यामुळे मनुष्याने कर्म चांगले केलं पाहिजे.परमार्थिक कार्यक्रम लहानपणापासून ऐकण्याची गोडी मुलांना निर्माण केली पाहिजे त्यातून संस्कार संस्कृती टिकून राहते.मनुष्याचे मन खंबीर असलं पाहिजे तरच मनुष्य जगाच्या दुनियेत टिकून राहतो.छोट्या छोट्या गोष्टी मुळे मन दुःखी न करता ते मन परमेश्वराच्या चिंतनात व्यतित केले पाहिजे.त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर सात्विकतेच तेही झळाळत असते.मन हे संसारात नको असलेल्या गोष्टीचं जास्त रमते.त्यामुळे त्या मनाला ताब्यात ठेवण्यासाठी वैराग्य आणि नामस्मरण ची जोडी द्यावी.व्यवहारामध्ये मनाला पुरावेच लागते पण ते मन परमार्थात देवाजवळ असले पाहिजे.जे शाश्वत आहे त्याकडे मनाने धाव घेतली तर आपले नाव कर्म कायम टिकून राहते.या सुंदर मनाने कसे सुंदर रहावे सांगताना उत्तररंगामध्ये संत एकनाथ महाराज याच्या मानस कन्या सुशिला यांचे आख्यान सांगताना सर्व ऐश्वर्य संपन्न जीवन असताना पती मात्र व्यसनी आणि दुराचारी असल्याने ती सतत दुःखी असते आणि त्या दुःखापासून संत एकनाथ महाराज कशी सुटका करून आयुष्य सुखी करतात.यावर सुंदर दृष्टांत देऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले नारदीय कीर्तनात संगीताचे विविध प्रकार त्यामध्ये आर्या.साकी.दिंडी.अभंग.गोंधळ.आदी प्रकार गात कीर्तनाला अधिक रंग भरला.त्यांना तितकीच दमदार आणि समर्पक साथसंगत हार्मोनियम गंगाधर देव तबला ज्ञानेश्वर दुधाणे टाळ माऊली पिसे यांनी दिली.
दुपारी महिलांच्या विविध स्पर्धेत सासू आणि सून यांच्या स्पर्धा पार पडल्या सासू आणि सून ह्या संसाराच्या भक्कम बाजू आहेत त्या एकमेकींशी आईमुली प्रमाणे टिकाव्यात या संकल्पनेतून ही सुंदर स्पर्धा पार पडली तिचे नियोजन देवकी दुधाणे आणि सुवर्णा कलढोणे यांनी सुंदर केलं होतं यावेळी थंडी असूनही अनेक रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने अधिक परिश्रम घेत आहेत.
फोटो सौजन्य साई डिजिटल रुपेश सदावर्ते करकंब