दानात- दान-मतदान
मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे याकरिता हि कविता
मतदानाचा हक्क बजावून करा देशाचे संरक्षण ।। १।।
मतदान हे एक असे पवित्र आद्य कर्तव्य ।
देशाचे हित जपल्याने होई तो महा-सत्ता भव्य दिव्य ।। २ ।।
आपण आहात कायदा पालन कर्त्या निश्चित ।
म्हणूनच कायद्याची निर्मिती हेचि संचित ।।३।।
आपले मतदान हेचि महिलांचे हित ।
महिला-समृध्दी कायदे मंजुरीत तुमची साथ ।।४।।
आपली अपत्ये ही भारताचे भावी नागरीक ।
त्यांचे उज्वल भविष्य घडेल माया-ममता जवळीक ।।५।।
महिलांच्या आधाराचा प्रश्न घराचे छप्पर ।
या साठी करा मतदान महिला प्रतिनिधींची साथ सत्वर ।। ६ ।।
जीवनी घर- संसारात काटकसर वस्तू गॅस पाणी वीज महागाई ।
तुम्ही तुमचे जीवन सुखकर करा मतदान करुनी दर पाच वर्षानी ।।७ ।।
महिलांनो मतदानाचा सहभाग करा निश्चित ।
समाज-जीवनात मान-सन्मान खचित ।।८ ।।
घरातुन मतदान ८५ वर्षांवरील जेष्ठांना अन दिव्यांगना ।
हीच शासनाची सुविधा सज्ज व्हा मतदाना ।।९ ।।
मतदानासाठी ईच्छा शक्ती जागृत ठेवा सर्वांनी ।
मान सन्मान वृध्दींगत समाज जीवनी ।।१०।।
लोक सभेत विधान सभेत आपल्या प्रश्नाना फुटेल वाचा।
जर आपण मतदान केले तर आदर महिलांचा ।। ११ ।।
महिला मतदारांची संख्या ५० टक्क्यांची ।
आपण करा मतदान प्रतिष्ठा तुमची ।। १२ ।।
आपले जीवन जगा सन्मानानी ।
पुरुषांच्या खाध्याला खांदा लावूनी ।। १३ ।।
महिलांनो मतदान दिनी आपणास एकच वचन ।
मतदानाचा हक्क बजावून करा देशाचे संरक्षण ।। १४ ।।
रचना- उर्मिला प्र भुतकर ठाणे. भूषण मो. ९७६९६०५०३९