सरपंच विश्वास महाडिक यांच्या हस्ते किटचे वाटप
पुळूज प्रतिनिधी दत्तात्रय पांढरे तेज न्यूज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अंतर्गत आनंदाचा शिधा गौरी गणपती निमित्त जाहीर करण्यात आले होते.
त्याचे वाटप पुळुज गावामध्ये लोकनियुक्त सरपंच विश्वास भैया विष्णुपंत महाडिक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी माजी सरपंच लक्षण पांढरे माजी सरपंच भारत पाटील, दत्तात्रय पांढरे विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक इमरान मुलाणी, रेशन दुकानदार आप्पासाहेब भुई, नानासो भुई, लिंगादेव म्हमाने, नंदू कोरे, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.