पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री माताजी निर्मला देवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदिरच्या इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी शालेय परिसरातील परदेशी नगर येथील श्री गणेश मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवले .यात 80 पेक्षा जास्त मुले सहभागी झाली होती. मुलांनी मंदिर परिसरात वाढलेली झाडे- झुडपे, गवत काढले. कचरा गोळा केला. व मंदिर परिसर स्वच्छ केला.
प्रशालेचे संघटक रवींद्र मामा साळुंखे, मुख्याध्यापक संतोष कवडे, महेश भोसले, दिनेश आगावणे , अशपाक मुजावर , आलंदीप टापरे , प्रमोद हुंगे यावेळी उपस्थित होते. या कामाबद्दल परदेशी नगर मधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.