पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा महाराष्ट्र घडवण्यासाठी व शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुन्हा प्रगतिशील वैभशील बनवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महिला आघाडी, सर्व युवा सेना शिवसेना आजी-माजी पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी भगवा सप्ताह राबवण्यात येणार आहे.
यासाठी पंढरपूर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने उदयिक दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी हॉटेल विठ्ठल इन येथे ठीक 11 वाजतां बहुसंख्येने उपस्थित रहावेत असे आवाहन शिवसेना पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने करण्यात येत आहे.
हा कार्यक्रम शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे मराठवाडा समन्वयक विश्वनाथजी नेरुरकर , विभागीय नेते ( सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर ) सुनिलजी प्रभू सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकिळ , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे माढा लोकसभा सहसंपर्क प्रमुख साईनाथ भाऊ अभंगराव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोलापूर जिल्हा प्रमुख ( पंढरपूर विभाग ) संभाजीराजे शिंदे, उपजिल्हा प्रमुख ( ग्रामीण ) जयवंत आण्णा माने,उपजिल्हा प्रमुख ( शहर ) सुधिरभाऊ अभंगराव, युवासेना प्रदेश सहसचिव स्वप्निलभैय्या वाघमारे महिला आघाडी जिल्हा संघटिका पुनम अभंगराव, युवासेना जिल्हा युवाधिकारी गणेश इंगळे, आरोग्य सेना जिल्हा संघटिका राजश्रीताई क्षीरसागर पंढरपूर तालुका प्रमुख बंडू घोडके,तथा शहर प्रमुख रविंद्र मुळे हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, तरी सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या पंढरपूर शहर व तालुक्यातील आजी माजी सर्व पदाधिकारी, सर्व महीला आघाडी व युवासेना, वैद्यकीय सेना, वाहतूक सेना, रिक्षा सेना तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या सर्व आजी माजी पदाधिकारी तथा शिवसैनिकांनी वेळेत व बहुसंख्येने हजर रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.