पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर मधील दुसरा लायन्स क्लब लायन्स क्लब पंढरपूर ड्रीम या क्लबचे तिसरा शपथविधी व पदग्रहण सोहळा नुकताच अतिशय दिमाखदार व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा झाला.
या क्लबचे नूतन अध्यक्ष पंढरपूर मधील प्रसिद्ध अस्थीरोगतज्ञ ला. डॉ मंदार सोनवणे,त्यांच्या सेक्रेटरी कृपा वेलनेस सेंटरच्या संचालिका ला. सौ. कृत्तांजली सावंत तसेच खजिनदार म्हणून पंढरपूर मधील PS Silver या फर्मचे ओनर चांदीचे ठोक व्यावसायिक ला.गणेश यलमार पाटील यांची निवड करण्यात आली.
प्रथम उपाध्यक्ष पंढरपूर मधील कॅन्सर तज्ञ ला. डॉ. अमित इनामदार तर द्वितीय उपाध्यक्ष म्हणून कंडरे फिटनेस हब चे ओनर तसेच प्रसिद्ध उद्योगपती ला. अजित कंडरे यांची निवड झाली.ज्येष्ठ लायन माजी प्रांतपाल Multiple Co- ordinator GMT, PMJF ला. जगदीशजी पुरोहित,कराड यांनी वरील सर्वांना त्यांच्या पदाची शपथ अत्यंत रसाळ व मनोरंजक पद्धतीने दिली व त्यांचे पदग्रहण करवले.मावळत्या अध्यक्षा ला. ललिता कोळवले यांनी नूतन अध्यक्ष ला. डॉ. मंदार सोनवणे यांच्या हाती गॉन्ग देऊन सूत्रे सुपूर्द केली.
तसेच नूतन सदस्य पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे माजी अधिक्षक डॉ. पंकज गायकवाड, शिवम ज्वेलर्सचे ओनर श्री. शहाजी नामदेव बाबर, सुहासिनी डेअरीचे ओनर श्री. शशिकांत कराळे, कुमार प्रॉपर्टीजचे सर्वेसर्वा श्री.कुमार वाघमोडे, नाट्य परिषद पंढरपूरचे कार्यवाह तसेच लक्ष्मणदास महाराज आश्रमशाळेचे सहशिक्षक श्री. विक्रम बिस्किटे यांनी लायन्स क्लब पंढरपूर ड्रीमचे सदस्यत्व स्वीकारले. त्यांना लायन्स प्रांत 3234 D1चे प्रांतपाल ला. MJF ला.मल्लीनाथ पाटील यांनी लायन्स सदस्यत्वाची शपथ दिली.
कार्यक्रमासाठी सांगोला येथील प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब देशमुख अध्यक्ष महाराष्ट्र राज्य युवक पुरोगामी संघटना,व उपजिल्हा रुग्णालयाचे मा.अधिक्षक डॉ. पंकज गायकवाड यांना आमंत्रित करण्यात आले होते.
डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी युवकांच्या उत्कर्षांसाठी ते कोणते उपक्रम राबवतात आणि लायन्स क्लबने पण काय केले पाहिजे याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले. यासाठी लायन्स क्लब पंढरपूर बरोबर कार्य करण्याची इच्छा व्यक्त करून क्लबच्या भावी कार्यकालास शुभेच्छा दिल्या.
दुसरे प्रमुख पाहुणे मा. डॉ.पंकज गायकवाड यांनीही ते स्वतः करत असलेल्या लोकोपयोगी कार्याची उदबोधक माहिती दिली त्याचबरोबर लायन्स क्लब पंढरपूर ड्रीममधील सदस्यांचे कार्य पाहून क्लब सदस्यत्व स्वीकारण्याची उत्स्फूर्त इच्छा प्रकट केली. ही एक फार मोठी व क्लबसाठी अभिमानास्पद असणारी घटना यादिवशी घडली.
कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेले रिजन 1 चे रिजन चेअरमन ला. राहुल दोशी यांनीही क्लबला मोलाचे मार्गदर्शन केले, क्लब सदस्यांच्या गुणवत्तेचे विशेष कौतुक केले व क्लबला शुभेच्छा दिल्या.
लायन्स क्लब पंढरपूर ड्रीम हा क्लब आपल्या अध्यक्षपदाच्या कालावधीत पुरस्कृत करणारे पंढरपूर नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष नगरसेवक व लायन्स प्रांताचे झोन चेअरमन ला. श्री. विवेक परदेशी यांनीही क्लब बरोबर सतत राहू ही ग्वाही दिली. क्लब सदस्यांना प्रोत्साहन दिले व शुभेच्छा दिल्या.
प्रस्ताविकामध्ये मावळत्या संस्थापक अध्यक्षा ला. ललिता कोळवले यांनी क्लबनिर्मितीची पार्श्वभूमी सांगून, कार्यक्रमाचा हेतू सांगितला भविष्यातले मनोरथ सांगितले. नूतन अध्यक्ष ला डॉ. मंदार सोनवणे यांनी आपला कार्यकाल निश्चितच संस्मरणीय होईल याची ग्वाही दिली.
कार्यक्रमात उपक्रम म्हणून नूतन खजिनदार वं डिस्ट्रिक्ट चेअरमन नेत्रदान ला. गणेश पाटील यांनी नेत्रदांनाविषयीं सखोल माहिती दिली व त्याबाबत तयार केलेले परिपत्रक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित केले. व त्याचे उपस्थित जनसमुदायामध्ये वाटप केले.
त्यांच्या मातोश्री तसेच भंडीशेगावच्या नूतन सरपंच म्हणून निवड झालेल्या सौ. सुमनताई महादेव पाटील यांचा मा डॉ. बाबासाहेब देशमुख व नवरंगे बालकाश्रमच्या अधिक्षिका तसेच लायन्स क्लब पंढरपूरच्या संचालिका ला. राजश्री गाडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
विविध संस्थांच्या उपस्थित प्रतिनिधीचा क्लबतर्फे सन्मान करण्यात आला. त्यामध्ये अनाथाश्रम, वृद्धाश्रम, इनरव्हील, इनरव्हील पर्ल्स, रोटरी क्लब, अपंग शाळा, अंधशाळा यांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता.
या समारंभासाठी पंढरपूरातले अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये डॉ. पवनकुमार मोहिते, मा. जयंत सोनवणे,श्री. संजय रणखांबे, श्री. महेश सावंत,शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा सौ. आरतीताई बसवंती, ओंकार बसवंती श्री. मनोज पिंपळे यांची उपस्थिती लाभली. ला. राणी विभुते, ला. रेखा मोहिते, ला. डॉ. रुचा सोनवणे, ला. तानाजी सालविठ्ठल,यावेळी इतर लायन्स सदस्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला.स्वाती जोशी यांनी केले तर आभार ला. गणेश पाटील यांनी व्यक्त केले.