मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
वांद्रे येथील सेंट टेरेसा बॉईज हायस्कूल येथे जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता आठवी ड च्या विद्यार्थीनी आसने, प्राणायाम, योग पूरक हालचाली, प्रात्यक्षिके, इत्यादी आसने पी टी शिक्षिका संजीवनी गजरे यांचे मार्गदर्शनाखाली केली.
योगामुळे आपले शरीर सुदृढ राहते, रोग प्रतिकारक शक्ती वाढते, शरीर निरोगी राहून बळकट बनते.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक फादर निकी, पी आर ओ फादर शिनॉय, उपमुख्यध्यापिका रोझ लोबो, पर्यवेक्षक फिलिप रॉड्रिग्ज, शिक्षक वर्ग आदी उपस्थित होते.
शिक्षिका प्रिया हटकर यांनी योग दिनाचे महत्व सांगितले.प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती.