पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
गुजरात येथील भाविक तेजसकुमार मगनभाई पटेल यांनी श्री विठ्ठल रूक्मिणीमातेस 5 किलो वजनाची चांदी वस्तू अर्पण केले आहेत. त्याची किंमत रू.5,40,000/- इतकी आहे.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने पटेल यांचा सत्कार मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी देणगीदार यांचे कुटुंब, विभाग प्रमुख ज्ञानेश्वर कुलकर्णी उपस्थित होते.