रुग्णसेवा हिच खरी ईश सेवा डॉ. संजीव ठाकूर अधिष्ठता डॉ वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
डॉ संजीव ठाकूर डॉ वैशंपायन स्मृती शासकीय वैधकीय महाविद्यालयात अधिष्ठता म्हणून नुकतेच रुजू झाले आहेत छत्रपती शिवाजी महाराज सर्वउपचार रुग्णालय म्हणजेच सोलापूर मधील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी सोलापूर जिल्हा सह उस्मानाबाद व कर्नाटक मधील अनेक जन येतात.
त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटल मध्ये नेहमीच उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाची संख्या देखील मोठी असल्यामुळे साहजिक सिव्हिल हॉस्पिटल वर मोठी जबाबदारी व ताण असतो. डॉ. संजीव ठाकूर यांनी नुकताच डॉ वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथील अधिष्ठता म्हणून पदभार घेतला असून रुग्ण सेवा हिच खरी ईश सेवा समजून सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाची ते विशेष काळजी घेऊन उपचार करतात वेदनेने त्रासाने व्याकुळ झालेले रुग्ण सिव्हिल हॉस्पिटल मधील उपचाराने आनंदी होऊन डॉक्टरांना धन्यवाद देऊन घरी जातात रुग्ण सेवा हिच खरी ईश सेवा समजून डॉ संजीव ठाकूर हे सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णची काळजी घेत असतात. सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाच्या मदतीला ते नेहमीच धावून जातात ऑपरेशन असो वा सर्जरी डॉ संजीव ठाकूर हे तत्पर हजर असतात. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांची अस्थेने विचारपूस करतात काय हवं काय नाही याची माहिती घेऊन रुग्णाच्या नातेवाईकांना सर्वतोपरी मदत करतात अश्या माणसातल्या देवाची भेट घेण्याचा योग आला आणि रुग्ण सेवा हिच खरी ईश सेवा काय असते अनुभवाला मिळाले. डॉ. संजीव ठाकूर यांचा पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद देखील उपस्थित होते डॉ संजीव ठाकूर यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.