फलटण प्रतिनिधी
राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे माजी मंत्री राष्ट्रनायक आ.महादेव जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली शनिवारी १७ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता शिखर शिंगणापूर, ता-माण येथे शंभू महादेवाचे आशीर्वाद घेऊन शेकडो चारचाकी गाड्याची "रॅली" शिंगणापूर - कोथळे - जावली - मिरडे - नाईकबोमवाडी - वडले - सोनवडी - सोनवडी बुद्रुक - कोळकी मार्गे फलटण शहरातील मेळाव्याच्या ठिकाणी दुपारी ०१:०० वाजता पोहोचेल. हजारोंच्या संख्येने मेळाव्याला उपस्थित राहावे आणि परिवर्तनाचे साक्षीदार बनावे.
तरी राष्ट्रीय समाज पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिंगणापूर येथे गाड्यांना झेंडे लाऊन सकाळी ठीक १०:०० वाजता उपस्थित राहावे. असे आवाहन आयोजक राष्ट्रीय समाज पक्ष माढा लोकसभा मतदारसंघ पदाधिकारी यांनी सांगितले आहे.