सोलापूर प्रतिनिधी
एन.बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूरच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत वडवळ येथे ७ दिवसाचे श्रम शिबिर दि. २५ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२४ आयोजित केले होते. या शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमात सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर नवले,वडवळ गावचे सरपंच जालिंदर बनसोडे, नागनाथ महाराज अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष शाहू धनवे,ग्रामपंचायत सदस्य राहुल मोरे, पोलिस पाटील दादासाहेब काकडे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष मनोजकुमार मोरे उपस्थित होते. या शिबीरा अंतर्गत विद्यर्थ्यांनी गावातील विविध भागात स्वछता व वृक्षारोपण केले.
पहिल्या दिवशी गावातील शहीद विश्वनाथ मोरे यांच्या स्मारक परिसराची स्वच्छता ,तसेच प्रा.सुशांत मोरे यांचे सेंद्रिय शेती याविषयावर व्याख्यान दिले.दुसऱ्या दिवशी गावातील यात्रा मार्ग स्वच्छता आणि वृक्षारोपण, तसेच आकाश फाटे यांचे उद्योग उभारणीसाठी लागणारी कौशल्ये या विषयावर व्याख्यान दिले. तिसऱ्या दिवशी बसवराज मंदिर आणि श्रीकृष्ण मंदिर परिसर स्वच्छता आणि वृक्षारोपण, तसेच प्रा. दिपक पारडे यांचे व्याख्यान दिले , चौथ्या दिवशी खर्गतीर्थ परिसर स्वच्छता आणि वृक्षारोपण, तसेच श्रीरंग लाळे ताण तणाव व्यवस्थापन आणि व्यक्तिगत मूल्ये या विषयावर व्याख्यान दिले. पाचव्या दिवशी मुंगीचा धोंडा स्वच्छता व बॅनर बनवणे , तसेच आदर्श शिक्षक बापूसाहेब दळवे सर यांनी विद्यार्थ्यांना तरुणाईची दशा आणि दिशा या विषयावर व्याख्यान दिले. सहाव्या दिवशी विविध ठिकाणी वृक्षारोपण व बोर्ड बसवणे, तसेच मनोजकुमार मोरे यांनी सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा या विषयावर विद्यार्थ्यांना व्याख्यान दिले. सातव्या दिवशी विद्यार्थ्यांनी गावातून जनजागृती रॅली काढली व गावामध्ये प्रबोधनाचे काम केले. निलेश व्यवहारे यांनी किल्ल्यावर आपण काय पाहिले पाहिजे, किल्ल्याचे प्रकार कोणते, कोणता किल्ला कोणत्या वातावरणात फिरवा, किल्ला ट्रेक करताना कोणती काळजी घ्यावी, कोणत्या वस्तू आपल्या सोबत असाव्या व ट्रेकच नियोजन कसे करावे, गडकिल्ले का फिरावे व कसे फिरावे या विषयावर व्याख्यान दिले. आपल्या व्याख्यानात मुलांना अनेक किल्ल्याची माहिती दिली.
तसेच या दिवशी समारोप कार्यक्रमासाठी वडवळ गावातील अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष शाहू धनवे, गावचे पोलिस पाटील दादासाहेब काकडे, मराठा सेवसंघाचे तालुका अध्यक्ष मनोजकुमार मोरे, श्रीकांत शिवपुजे, राहुल मोरे, हरून शेख,संदीप आदमाने, सोमनाथ मोरे, शिवाजी जगताप, गणेश जगताप श्रीकांत मोरे, अविनाश शिवपूजे, मिथुन दुपारगुडे शिबिराचे समनव्यक प्रा. लामकाने सर उपस्थित होते. गावकऱ्यांनी मुलांनी केलेल्या कामांचे कौतुक केले, या शिबिराचे आयोजन प्रा. सुरज धनवे व प्रा. शशीकांत लामकाने यांनी केले.