पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयतील बंद असलेली सिटीस्कॅन मशीन तातडीने सुरू करावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने राज्याचे आरोग्यमंत्री नाम.प्रकाश अबिटकर यांच्या कडे केली असल्याची माहिती सोलापूर जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
पंढरपूर हे देशातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी आहे.त्यांना सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा,उपचार येथे उपलब्ध व्हावेत,त्यासाठी यात्रेपूर्वी आरोग्य विभाग खुप सेवा,सुविधा उपलब्ध करते मात्र यात्रेनंतर त्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध,चालू राहतील याकडे लक्ष दिले जात नाही.ही वस्तुस्थिती आहे.त्याचेच उदा.
म्हणजे येथील *सिटीस्कॅन* मशीन सुमारे *दीड महिन्यापासून बंद* आहे.त्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या व गरजू रुग्णांची *सिटीस्कॅन* द्वारे तपासणी करता येत नाही,होत नाही.
भाविक व पंढरपूर परिसरातील गरीब, मध्यमवर्गीय रुग्णांची गरज ओळखून पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात "*सीटीस्कॅन"* मशीनची सेवा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र ती सातत्याने उपलब्ध होत नाही. सदर मशीन *दीड महिन्यापासून नादुरुस्त आहे, बंद आहे. त्यामुळे रुग्णांना खाजगी हॉस्पिटलमध्ये किंवा खाजगी सिटीस्कॅन सेंटरमध्ये धाव घ्यावी लागते. तेथील तपासणीचे दर गरीब व मध्यम आर्थिक परिस्थिती असणाऱ्या रुग्णांना परवडणारे नाहीत.त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयामध्ये सर्व सेवा,सुविधा उपलब्ध असणे व सातत्याने चालू राहणे हे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे. परंतु येथील उपजिल्हा रुग्णालयतील *"सिटीस्कॅन"* ही महत्त्वाची मशीन बंद असल्यामुळे तातडीच्या तपासणीसाठी,उपचारासाठी सोलापूर किंवा पंढरपुरातील खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो, त्यामुळे त्यांना प्रचंड आर्थिक भार,मानसिक त्रास सोसावा लागतो.तसेच रुग्ण व नातेवाईकांची अत्यंत धावपळ होते.तरी आपण गांभीर्याने याबाबत लक्ष घालून पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन का बंद आहे याची चौकशी करून ती तातडीने चालू होण्यासाठी आदेश व्हावेत.
ही मशीन लवकरात लवकर चालू होणे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे.अन्यथा गंभीर रुग्णांसाठी मशीन बंद असल्याने त्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी गांभीर्याने व तातडीने येथील "*सिटी स्कॅन*"मशीन सुरू करतील व रुग्णांना सेवा मिळेल अशी अपेक्षा ग्राहक पंचायतीचे प्रांत सहसचिव दीपक इरकल,सदस्य विनोद भरते,सुभाष सरदेशमुख, जिल्हा उपाध्यक्ष विनय उपाध्ये,जिल्हा सचिव सुहास निकते,सदस्य संतोष उपाध्ये पंढरपूर तालुका अध्यक्ष नंदकुमार देशपांडे, सचिव महेश भोसले,उपाध्यक्ष प्रशांत माळवदे,सहसचिव आझाद अल्लापूरकर,शाम तापडिया यांनी केली आहे.

