भाळवणी प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटास निवडणूक कार्यालयाकडून पक्ष व घड्याळ चिन्ह मिळाल्याने प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष समाधान काळे यांच्या हस्ते साखर वाटून जल्लोष करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे म्हणाले की नुकतेच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह घड्याळ हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेच आहे असे सांगितले आहे. त्यामुळे आम्ही प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अभिनंदन करून साखर वाटप केले आहे.यापुढे राज्यातील जनतेच्या अडचणी सोडविण्याकरिता गती येईल.
यावेळी सुरेश देठे, दाऊद शेख,सुनील पाटील,सरपंच रणजित जाधव,दिलीप भानवसे,शकील काझी,बाळराजे निंबाळकर, निहाल शेख,योगेश जाधव,सागर चौगुले ,संजय मासाळ,राजू मासाळ,सुहास सराटे,सुजित हैबत्ती, नाना लिंगे, महेश बोचरे, तन्वीर शेख, गणेश गुरव, योगेश जाधव, हणमंत गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते.
एक आठवण