भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील उत्कर्ष वाचनालयाच्या वतीने नूतन सरपंच रणजित जाधव यांचा सत्कार सेवानिवृत्त मुख्याध्यापक भीमराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पंढरपूर तालुका कार्याध्यक्षपदी सुनील पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या सोलापूर जिल्हा सचिव पदी निवड झाल्याबद्दल निहाल शेख, पंचायत समितीचे लेखापरीक्षक मंगेश शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शहाजहान काझी, संदीप जाधव, नागेश गवळी, उत्तम सराटे, हनुमंत गायकवाड, मोहन वाघमारे आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी आयोजक धनंजय गाजरे यांनी आभार मानले.