सातारा प्रतिनिधी
समस्त शिंपी समाज सामाजिक संस्था सातारा यांच्यातर्फे स्वयंवर वधु वर पालक परिचय मेळावा 2024 .हा मेळावा दिनांक ४ फेब्रुवारी २०२४ रोजी संपन्न झाला.जवळपास ४५० वधू-वरांची नोंद झाली आहे.
नामदेव शिंपी समाज सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकारी सदस्य यांनी खूप मोठ्या प्रमाणात मेहनत घेऊन कार्यक्रम उत्तम रित्या पार पडला तसेच समाजातील सर्व बंधू-भगिनींचे उत्तम सहकार्य लाभले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे ह भ प महाराज निवृत्ती नामदास संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे सतरावे वंशज हे लाभले तसेच नामदेव समाजोन्नती परिषदेचे जिल्हाध्यक्ष सातारा इंजिनिअर सुनील पोरे त्याचप्रमाणे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत शेळके उपाध्यक्ष सुनील हेंद्रे महिला अध्यक्ष मीनाताई बारटक्के आदी मान्यवर उपस्थित होते. व तसेच मोठ्या प्रमाणात जाहिरात व देणगीदार यांनी सहकार्य करून कार्यक्रम उत्तम प्रकारे संपन्न झाला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, समाजातील पुरुष व महिला कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेतले.