मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
आंतरराष्ट्रीय मानव - हक्क सेवा परिषद (महाराष्ट्र ) व आपलं आदर्श मुंबई फाउंडेशनच्या वर्धापन दिनाचे औचित्याने अपंग संस्था , अंध व मूकबधिर संस्था , पर्यावरण सुरक्षेसाठी कार्य करणाऱ्या संस्था , पाणी विषयावर कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था , वृक्षमित्र संस्था , प्रदूषण , आरोग्य व शिक्षण क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था यांच्या सहित महाराष्ट्रात विविध क्षेत्रात उल्लेखनीय समाजकार्य करणाऱ्या संस्था व समाजसेवकांचा " नॅशनल एक्सलेन्स स्टार अवॉर्ड " या मानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमात सामाजिक , साहित्य ,कला, क्रीडा, नृत्य ,लेखन, कृषी , सरपंच ,उद्योग, पत्रकारिता, अशा विविध क्षेत्रात १० वर्षांहून अधिक उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्था व व्यक्तींचा गौरव करण्यात येणार असल्याचे मुख्य संपादक डॉ. संजय भोईर यांनी जाहिर केल्याचे संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र पाटे यांनी सांगितले. इच्छुकांनी आपला प्रस्ताव ९८१९१४५३५४ या क्रमांकावर २८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पाठवा . किंवा bhoirsanjay24 @ gmail.com यावर मेल करा . असे संयोजक वर्षा यादव व पूनम पाटगावे यांनी कळविले आहे.