शेळवे प्रतिनिधी
शेळवे येथील सनराइज् पब्लिक स्कूल मध्ये राज्यसेवा स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलेल्या अधिकाऱ्यांचे सन्मान करण्यात आले त्यामध्ये पंढरपूर येथील धनराज भोसले तसेच गादेगाव येथील जलसंपदा अधिकारी राहुल बागल व खेडभाळवणी येथील नुकतीच कृषी अधिकारी पदावर नियुक्ती झालेले राकेश साळुंखे यांचा प्रशालेच्या वतीने सन्मान करण्यात आला,वरील सर्व यशस्वी अधिकाऱ्यांनी आपल्या कष्टाने राज्यसेवा स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवून गावाचे तसेच आई-वडिलांचे नाव रोशन केले बद्दल सनराईज पब्लिक स्कूलच्या वतीने त्यांच्या सन्मानाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कीर्तनकार,प्रवचनकार व व्याख्याते अविनाश भारती यांची प्रमुख उपस्थिती लाभली यांनी आपल्या ओघवत्या वक्तृत्वशैली मधून विद्यार्थी तसेच पालक वर्ग यांना मंत्रमुग्ध केले. आई-वडील आणि गुरुजी यांच्या शब्दावरती विश्वास ठेवून जर आपण मार्गक्रमण केली तर यश हमखास मिळते असे त्यांनी आपल्या व्याख्यानातून सांगितले, तसेच वर्ग एकचे अधिकारी धनराज भोसले यांनी विद्यार्थी दशेतील अपयशाचे महत्व पटवून दिले. अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे हे त्यांनी पटवून सांगितले.
तसेच जलसंपदा अधिकारी राहुल बागल व कृषी अधिकारी राकेश साळुंखे यांनी विद्यार्थी दशेपासूनच स्पर्धा परीक्षेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे हे त्यांनी पटवून सांगितले सदर कार्यक्रमासाठी खेड भाळवणीचे उपसरपंच शहाजी पाटील कौठाळी येथील जेष्ठ नागरिक संतोष नागटिळक,शेळवे येथील प्रगतशील बागायतदार योगेश गाजरे, गादेगाव येथील शिवाजी बागल, शेळवे येथील युवराज गाजरे यांची उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक मोहन गायकवाड यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार संस्थेचे संस्थापक सचिव अंकुश गाजरे यांनी मानले, कार्यक्रमाचे नियोजन आणि व्यवस्थापन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाधान गाजरे व संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे यांनी केले, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.