मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
ठाणे जिल्हा नामदेव शिंपी उन्नती मंडळ आणि नामदेव शिंपी हितवर्धक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिंपी समाजातील नामदेव, अहिर, भावसार, वैष्णव समस्त शिंपी समाजातील वधूवर मेळाव्याचे आयोजन ४ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० ते ४ यावेळेत ए. के. जोशी इंग्रजी शाळा, महात्मा फुले मार्ग, नौपाडा ठाणे वेस्ट या ठिकाणी करण्यात आले आहे.
जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी ठाणे जिल्हाध्यक्ष रवींद्र कालेकर यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी ९९६७५८५८१६, ९६९९५६९०२२ करू शकता.