सोलापूर प्रतिनीधी
यात आरोपी नामे शरणाप्पा गुरप्पा भासगी रा. अक्कलकोट यास नगरपरिषदेच्या कर्मचा-यावर हल्ला केल्याप्रकरणी सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी रुपये ५०,०००/- च्या जात मुचलक्यावर जामीन मंजुर केला.
यात हकिकत अशी की, फिर्यादी अक्कलकोट नगरपरिषद येथे सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. दिनांक 30/12/2017 रोजी सकाळी 7.15 च्या दरम्यान फिर्यादी हा त्याच्या सहकर्मचा-यां सोबत अक्कलकोट येथील सुभाष गल्ली येथे सफाई करत होता. फिर्यादी हा तेथील नागरिकांना ओला कचरा व सुका कचरा असे वर्गीकरण करुन कचरा ठेवा. त्यावेळी तेथे राहणा-या आरोपी नामे शरणाप्पा गुरप्पा भासगी याने फिर्यादीस शिवीगाळ केली व जोरजोरात आरडओरडा करुन हल्ला केला अशाप्रकारे सरकारी कामात अडथळा आणला अशा आशयाची फिर्याद अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन येथे दाखल झाली होती.
यातील आरोपी नामे शरणाप्पा गुरप्पा भासगी याने अटकपूर्व जामीन मिळणेकामी ॲड. अभिजीत इटकर यांच्यामार्फत सोलापूर येथील सत्र न्यायालय येथे जामीनासाठी अर्ज दाखल केला.
यात आरोपीतर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, आरोपी भासगी याचा सरकारी कामात अडथळा आणण्याचा कुठलाही उद्देश नव्हता. कर्मचा-यांशी झालेला किरकोळ वादाचे रूपांतर खोटया घटनेमध्ये केलेले असुन त्रास देण्यासाठी सदरची खोटी केस दाखल केली. त्यापोटी आरोपीच्या वकिलांनी अनेक उच्च न्यायालयाचे निवाडे दाखल केले.
सदरचा युक्तीवाद ग्राह्य धरुन मा. सत्र न्यायाधीश यांनी आरोपी नामे शरणाप्पा गुरप्पा भासगी रा. अक्कलकोट याची अटकपूर्व जामीनावर मुक्तता केली.
यात आरोपीतर्फे ॲड. अभिजीत इटकर, ॲड. राजशेखर कोरे, ॲड. संतोष आवळे, ॲड. राम शिंदे, ॲड. फैय्याज शेख, ॲड. शिवाजी कांबळे,ॲड. सुमित लवटे, यांनी काम पाहिले.