शेळवे प्रतिनिधी
यशोदा प्रतिष्ठान संचलित सनराईज पब्लिक स्कूल शेळवे येथे स्वतंत्र भारताचा अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला,महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे संपादक आणि सुप्रसिद्ध व्याख्याते अविनाश सुर्वे हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. तर वाखरी गावचे जेष्ठ नागरिक लक्ष्मण गायकवाड हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी सैनिक गजेंद्र पवार,दै. पुण्य नगरी चे उपसंपादक सतिश बागल,शेळवे गावचे मा.उपसरपंच तुकाराम गाजरे,प्रगतशील बागायतदार अजिनाथ गाजरे,आय.सि.आय बँकेचे मॅनेजर विजय शिंदे,पो. कॉं. विठ्ठल विभूते यांचे वडील तुकाराम विभूते, प्रगतशील बागायतदार.नागनाथ धुमाळ कर्मवीर औदुंबर अण्णा पाटील ऍग्रो प्रोड्युसर कंपनी चे चेअरमन किरणराज घोडके,सरकोली चे युवा नेते गणेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले,कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाधान गाजरे यांनी प्रशालेच्या प्रगतीचा आलेख मांडला,त्यानंतर विद्यार्थ्यांचे उपक्रम घेण्यात आले,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अविनाश सुर्वे यांनी आपल्या सुंदर व्याख्यानातून पालक तसेच विध्यार्थी या दोन्ही घटकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले,किरण घोडके यांनी आपल्या मनोगतातून प्रशालेचे कौतुक केले,कार्यक्रमाचे नियोजन आणि व्यवस्थापन संस्थेचे संस्थापक सचिव अंकुश गाजरे व संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.हर्षदा वाडेकर व मोहन गायकवाड यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक,कर्मचारी व विध्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमास परिसरातील असंख्य शिक्षण प्रेमी नागरिक, ग्रामस्थ,पालक परिवार यांची उपस्थिती लाभली,अनेक पालकांनी विध्यार्थ्यांसाठी खाऊ भेट दिला,विध्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.