पंढरपूर प्रतिनिधी
ह.भ.प. श्री प्र.द. निकते गुरुजी यांचे आज गुरुवार दि.७/१२/२०२३ दुपारी ०२:०० वा. दुःखद निधन झाले.
या पृथ्वीतलावर नामदेवमय जीवन जगणारे एकमेव व नामाचा महिमा, चरित्र पाठ, संत नामदेव गाथा पारायण, संत नामदेव गाथा यज्ञ माणकरी, नामदेव गाथा अभ्यास क्रम, नामदेव गाथा चिंतन, संपूर्ण नामदेव भक्ताला व समाजाला संत नामदेव महाराज अगदी सहजपणे अवतरत होते, व उत्तम वक्ते अशी त्यांची ख्याती होती.
पंढरी मध्ये प्र द म्हटले की नामदेव महाराज अशी त्यांची ओळख होती..!त्यांनी जीवनभर संत नामदेव महाराजांच्या कार्याचा उपदेश देत असतं..!
गुरुजीकडून संत नामदेव मंदिरात सलग ९ तास एकाजागी बसून आम्ही सर्वांनी संत नामदेव महाराजांच्या समाधीचे वर्णन ऐकण्याचे भाग्य लाभले असलेला मी स्वतः साक्षीदार आहे..!
प्रचंड विधवत्ता ज्ञान उत्तम शिक्षक पुरस्कार प्राप्त असे अनेक वचनांनी त्यांनी पदे भुषवलेली होती अशी थोर विभूती आपल्या आयुषात कदापी न होणे..!
गुरुजींना श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री केशवराज व श्रीसंत नामदेव महाराज चरणी विनंती करतो की त्यांना चिरशांती लाभो.अशी माहिती धनंजय जवंजाळ यांनी दिली.