सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन आठ मजली १०८ कोटीचे बजेट असलेली सर्व सुख सोयी सुविधांनी युक्त असणाऱ्या इमारतीस शासनाने प्रशासकीय मान्यता दि.१७ नोव्हे २०२२ रोजी दिली आहे . सदर नवीन इमारतीच्या टेंडर प्रक्रिया संदर्भात पाठपुरावा सुरू आहे.
यासाठी सोलापूर विधिज्ञ संघाचे अध्यक्ष ॲड. सुरेश गायकवाड सचिव. करण भोसले, खजिनदार अविनाश काळे, कार्यकारी समिती चे ॲड.विजय पी. शिंदे आदींनी बार्शी चे आमदार राजाभाऊ राऊत यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर निवेदन देण्यात आले.
त्यावरून आमदार राऊत यांनी तातडीने संबंधित सां.बा.वि. चे कार्यकारी अभियंता सोलापूर यांच्या समवेत चर्चा केली व सदरचे काम मार्गी लागले असल्याचे सांगितले.शिवाय संबंधित अधिकार्यानी ॲड.गायकवाड यांच्या समवेत देखील चर्चा करून सध्या स्थिती सांगितली त्यामुळे सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचा पायाभरणी समारंभ जानेवारी २०२४ मध्ये होण्याची शक्यता वाढली आहे
.यावेळी बार्शी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अविनाश जाधव, सागर रोडे ,श्याम झालटे ॲड अक्षय पाटील ॲड.,स्वप्नील.खंडागळे,ॲड.विवेक गजशिव व इतर वकील मित्र उपस्थित होते.