सोलापूर प्रतिनिधी
श्री सिध्देश्वर इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये क्रीडा सप्ताहाचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. खेळ हा विद्यार्थी दशेतील एक अविभाज्य घटक आहे. खेळाने शारीरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक आरोग्यही साधले जाते. आत्मविश्वास एकाग्रता आदींबरोबर सांघिक शक्तीचाही विकास होतो. विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.
राष्ट्रीय डाॅजबाॅल स्पध्रेत सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थिनी कु. नंदिता नंदुरकरचे पालक श्री विक्रम नंदुरकर व सौ प्रियांका नंदुरकर हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे सदस्य डॉ. राजशेखर येळीकर होते. याप्रसंगी मुख्याध्यापक श्री. योगेश राऊत, पर्यवेक्षक श्री शिवराज बिराजदार यांची उपस्थिती लाभली. श्री. डाॅ राजशेखर येळीकर यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. नंतर प्रज्वलित ज्योत डाॅ येळीकर यांनी शाळेची क्रिडा प्रतिनिधि कु. नंदिता नंदुरकर हिच्याकडे सोपविण्यात आली. त्यानंतर मा. श्री. येळीकर यांच्या हस्ते राष्ट्रीय डाॅजबाॅल स्पध्रेत सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थिनी कु. नंदिता नंदुरकरचे पालक श्री विक्रम नंदुरकर व सौ प्रियांका नंदुरकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांमधील उत्तम खेळाडू तयार करणाऱ्या व त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या क्रीडा शिक्षक श्री पवन भोसले सरांचाही याप्रसंगी गौरव करण्यात आला.
तलवारबाजी मधील ईपी प्रकाराचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.सदर कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.