बारामती प्रतिनिधी
रयत भवन बारामती येथे हिंदु शेगर धनगर समाजाच्या वतीने लिमटेक गावचे सुपुत्र व नेहमी सामाजिक क्षेत्रामध्ये गोरगरीब रुग्णांना रात्री अपरात्री मदत करणारे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे उपजिल्हा समन्वयक सतीश महादेव गावडे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, श्रीकांत फाउंडेशनचे अध्यक्ष खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री कार्यालयाचे ओएसडी मंगेश चिवटे मुख्यमंत्री कार्यालयाचे कक्ष प्रमुख राम राऊत,पंढरपूरच्या मनिषाताई वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक रुग्णांना मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या माध्यमातून वैद्यकीय मदत निधी उपलब्ध करून दिली व गोरगरीब जनतेसाठी अनेक गावांमध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे माध्यमांतून वरीष्ठ डॉक्टरांना घेऊन महाआरोग्य शिबिर आयोजित केले होते.
त्यामध्ये अनेक रुग्णांना त्याचा फायदा झाला होता तसेच बारामती ते पढंरपुर पालखी या सोहळ्या दरम्यान पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी प्रत्येक गावामध्ये महाआरोग्य शिबिर घेऊन त्यांनी सामाजिक कार्य केल्यामुळे सतीश गावडे व त्यांच्या सौभाग्यवती नलिनी सतीश गावडे यांचा सत्कार स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्याप्रसंगी हिंदू शेगर धनगर समाजाचे अध्यक्ष सुनील रावजी भगत, अनंतराव रोटे बारामतीतील तज्ञ डॉ. सरोजनी सतीश राव खोमणे माळेगाव कारखान्याचे विद्यमान संचालक ॲड.गुलाबराव गावडे पाटील छत्रपती कारखान्याचे माजी संचालक व पंचायत समितीचे सभापती भारत नाना गावडे , गोपाळराव गावडे पाटील व जनस्वराज्य क्रांतीचे अध्यक्ष दशरथ नाना राऊत , दत्तात्रय सांगळे व इतर मान्यवर उपस्थित होते