अक्कलकोट प्रतिनिधी
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टला भेट देऊन स्वामींच्या चरणी लीन होत राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष दिपक मानकर यांनी मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी स्वामींची आरती करण्याचे भाग्य देखील मानकर यांना लाभले. यावेळी अक्कलकोट देवस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात आलेला स्वागतपर सन्मान स्विकारण्यात आला.
यावेळी मानकर म्हणाले की,'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे उद्गार सदैव कृतिशील राहण्यासाठी प्रेरित करतात. देवस्थान ट्रस्टने केलेला प्रेमळ सन्मान, स्वामींचे दर्शन आणि आरती करण्याचे लाभलेले भाग्य माझ्यासाठी नक्कीच प्रसन्न अनुभूती देणारे क्षण ठरले आहे.असे हि मानकर म्हणाले.
यावेळी अक्कलकोट देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महेशजी इंगळे, अक्कलकोट आणि अन्न छत्र मंडळाचे अध्यक्ष अमोलराजे भोसले, मा. नगरसेवक दत्ता सागरे, शिवराज स्वामी, बसवराज कोळी, शिवानंद सोनटक्के, मनोज काटगाव, सचिन म्हेत्रे आणि आकाश शिंदे उपस्थित होते.