सातारा प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्यावतीने छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे रोजी महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री व रयत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त संस्थेचे चेअरमन, चंद्रकांत दळवी IAS (Retd.) , यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड.भगीरथ शिंदे , संघटक डॉ.अनिल पाटील , मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा.रामशेठ ठाकूर , सचिव विकास देशमुख IAS (Retd.), उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्रिं.डॉ.ज्ञानदेव म्हस्के , सहसचिव ऑडीट प्रिं.डॉ.शिवलिंग मेनकुदळे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे , व महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी हे उपस्थित होते.