पंढरपूर प्रतिनिधी
वाढदिवस, महापुरुषांच्या जयंती यापुढील काळात विविध सामाजिक उपक्रम राबवून कराव्यात असे मत माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसा निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराच्या प्रसंगी युटोपीयन साखर कारखाना चे चेअरमन उमेश परिचारक यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष लक्ष्मण पापरकर हे उपस्थित होते.
नवशक्ती सामाजिक संघटना इसबावी व युनिक हॉस्पिटल पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबिरात मोफत नेत्ररोग तपासणी,हाडांचे आजार,त्वचेचे आजार,तसेच महिलांच्या विविध समस्या यावर तज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून मोफत उपचार केले असल्याची माहिती माजी नगरसेवक गणेश अधटराव व डॉ.अमित आसबे यांनी दिली.
आरोग्यासाठी सर्वांनी जागरूक असले पाहिजे,आपण आजारीच पडू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, परिपूर्ण व्यायामाची गरज असून योग्य आहार घ्यावा व निरोगी राहावे असे मत मुबई येथील उद्योजक अजित कंडरे यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमास माजी नगरसेवक विशाल मलपे,माजी नगरसेवक बालाजी मलपे,अस्थिरोग तज्ञ डॉ.पारस राका, त्वचारोग तज्ञ डॉ.अरुण मेणकुदळे, डॉ.अभिजित नामदे,डॉ.सुरज तंटक,स्त्रीरोग तज्ञ डॉ.प्रिया भिंगे,डॉ.अंजु आसबे,डॉ.भाग्यश्री स्वामी,भाजप वैद्यकीय सेल चे अध्यक्ष डॉ.श्रीधर येलमार,आदी उपस्थित होते ,उपस्थितांचे आभार राजू पाटील यांनी मानले.