पंढरपूर प्रतिनिधी
तरुणीपासून ते वयस्कर महिला पर्यंत आपल्या वयाचं भान हरपून महिलांनी श्री. रुक्मिणी विद्यापीठ आयोजित श्रावणसरी मंगळागौर स्पर्धेत नातेपुते, सांगोला, अक्कलकोट, पंढरपूर येथील बारा संघाने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत महिलांनी आपले कलागुण दाखविण्याचा मुक्तपणे मिळालेला व्यासपीठाचा आनंद घेत मंगळागौर गाण्यावर ठेका धरत सुप नाचवणे, घागर फुंकणे या खेळाबरोबर झिम्मा, फुगडी या पारंपारिकतेबरोबर दांडपट्टा चालवत, तलवारबाजी करत महिलांनी माहेरची ओढ व सासरच्यांना टोमणे देत प्रेक्षकांची मने जिंकली.
प्रारंभी संस्थापक सचिवा सुनेत्राताई पवार.सुप्रियाताई पवार.संयोजिका यांचे शुभहस्ते. दीपप्रज्वलन व कलश पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली .
महिलांना मार्गदर्शन करताना सौ. सुनेत्राताई पवार म्हणाल्या की कुटुंबात आईची भूमिका सर्वात महत्त्वाची असून तीच फक्त सामाजिक एकता आणि एकात्मतेसाठी प्रयत्नशील असते. कुटुंबासाठी महिलांचे योगदान महत्त्वाचे असून स्त्रियांनी आपले राहणीमानात सुधारणा करून स्त्रियांना आपले विचार, आचार सर्वापर्यंत मुक्तपणे पोहोचवता यावेत या उद्देशाने संस्थेने मंगळागौर हा कार्यक्रम आयोजित केला असून यापुढेही महिलांसाठी विविध कार्यक्रम राबविणार असल्याचे सांगितले. तर आपल्या घराचे महत्त्व सांगताना त्या म्हणाल्या की खिडकी आपणाला दूरदृष्टी शिकवते ,दरवाजा यशाला व स्वप्नांना प्रवेश करण्यास सांगत असते, छत आपल्याला उंच भरारी घेण्याविषयी सांगते व घड्याळ वेळेचे महत्व ठेवण्यासाठी शिकवते व घराचा छत उंच भरारी घेताना पाय जमिनीवर कायम जखडून ठेवण्याचे शिकवते
या मंगळागौर स्पर्धेत प्रथम क्रमांक महाशक्ती ग्रुप, द्वितीय क्रमांक पारिजात ग्रुप व उत्तेजनार्थ जानुबाई ग्रुप या संघाने मिळविला या यशस्वी तांना रुपये १००००, रुपये ७००० व रुपये २०००चे रोख बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविले तर तळ्यात मळ्यात या कार्यक्रमात कार्तिकी देशपांडे यांनी यश संपादन केल्याबद्दल त्यांना माहेरची साडी भेट देऊन गौरविले .कार्यक्रमाचे परिक्षण ज्योती चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमासाठी वसुधा कुंभार संचालिका, नंदिनी गायकवाड.प्राचार्या सविता लोखंडे , विभावरी डुबल सांस्कृतिक विभाग प्रमुख,अनुराधा पाटील जिजाऊ पुरस्कार विजेत्या, वर्षा पाटील, संगिता पवार , स्मिता डुबल.यांचे सह बहुसंख्य महिला वर्ग उपस्थित होता .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी माधुरी बोडके ,फरहाणा कादरी, कुमुदिनी सरदार, राणी गावडे ,वैशाली कदम, सुवर्णा जगदाळे, जयश्री खडतरे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुचक व मनोरंजनात्मक असे डॉ.वनिता घाडगे- देसाई यांनी केले.