तब्बल २०० हुन अधिक रक्तदात्यांनी नोंदविला सहभाग
तुंगत प्रतिनिधी
पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ प्रशांत परिचारक यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून पांडुरंग परिवार तुंगत यांचे वतीने १० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरास परिचारक प्रेमी कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
तालुक्यातील तुंगत या ठिकाणी गावचे माजी सरपंच आगतराव मास्तर रणदिवे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी स्व. माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे पुण्यतिथीनिमित्त तसेच माजी आ. प्रशांतराव परिचारक यांचे वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते याचाच भाग म्हणून रविवार १० सप्टेंबर रोजी प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येथील श्री गणेश मंदिराच्या सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी नऊ वाजता आयोजित या शिबिराचे प्रमुख उद्घाटक म्हणून युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक उपस्थित होते प्रारंभी उमेश परिचारक यांच्या हस्ते स्व. माजी आ. सुधाकरपंत परिचारक यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी आगतराव मास्तर रणदिवे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती हरिष गायकवाड, माजी संचालक खंडेराव रणदिवे, विविध कार्य. सेवा सोसायटी चेअरमन महेश रणदिवे, सोसायटीचे व्हाईस चेअरमन ब्रह्मदेव रणदिवे, महादेव रणदिवे, राजु भोसले, संजय रणदिवे, ग्रामपंचायत मा.सदस्य वामन वनसाळे, बाळू आंध, लक्ष्मण कदम प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरुवातीला तुंगत जिल्हा परिषदेचे शिक्षक माळी यांना आदर्श पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल परिचारक यांचे हस्ते सत्कार करण्यात आला त्यानंतर रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याची जाणिव ठेवत पांंडूूरंंग परिवाराचे वतीने परिचारक कुटुबीयांचे ऋणानुबंध दृढ होण्यासाठी दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असते यामध्ये शालेय विद्यार्थांना साहित्य वाटपासह, खाऊ वाटप कार्यक्रम प्राधान्याने आयोजित केले जातात. तुंगत परिसरात परिचारक प्रेमी समर्थकांची मजबूत फळी आगतराव (मास्तर) रणदिवे यांची असल्याने शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. दुपारी तीन पर्यंत तब्बल २०० हुन अधिक रक्तदात्यांनी या शिबीरामध्ये सहभागी होत रक्तदान केले.
कार्यक्रम यशस्वी करणेसाठी पांडुरंग परिवारातील आनंद आंध, महेश पवार, गजेंद्र रणदिवे, संतोष भांगे, दत्तात्रय भांगे, बाळासाहेब देठे, शेखर रणदिवे, गणपत रणदिवे, दत्तात्रय रणदिवे, कृष्णा पवार, विजय सुरवसे, महादेव भुसे, महादेव रणदिवे, फय्याज मुलाणी, कुमार माळी, युवराज रणदिवे, पोपट मोरे, रमेेश आंध, महेश गायकवाड,अनिकेत रणदिवे, सर्जेराव भोसले, रामकृष्ण नागणे, हुसेन मुलाणी, अविराज रणदिवे, सुनिल आंध, तेजस गोडसे, विजय पवार, आप्पा इंगळे, संदीप मोरे, अक्षय नागणे, संतोष कांबळे, आदींसह कार्यकर्यांनी परिश्रम घेतले.