पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
द लायन्स क्लब ऑफ पंढरपूर ड्रीम, रोटरी क्लब ऑफ पंढरपूर, सेवा कॅन्सर हॉस्पिटल संयुक्त जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
या उपक्रमात महिलांची गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरसाठी पॅप स्मियर व स्तनाच्या कॅन्सरसाठी थर्मल स्कॅन या तपासण्या तज्ञ महिला टेक्निशियन कडून करण्यात आल्या.
या उपक्रमाचे उदघाटन पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत डगळे IPS,पोलीस उपविभागीय अधिक्षक पंढरपूर हे होते तर प्रमुख अभ्यागत सीमा परिचारक या होत्या.सर्वांचे स्वागत ला. डॉ. मंदार सोनवणे यांनी केले तर प्रास्ताविक रो. वैभव सादिगले यांनी केले.
या उपक्रमात सेवा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर अमित इनामदार कॅन्सर तज्ञ यांचे अतिशय बहुमोल असे मार्गदर्शन लाभले. त्यांनी कॅन्सर म्हणजे काय, त्याची कारणे कोणती पूर्वावस्थेत ओळखण्यासाठी स्क्रीनिंग टेस्टची आवश्यकता कॅन्सर होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यावी, त्यातूनही झालाच तर काय करावे ? आहार कसा असावा, निर्व्यसनी राहणे का गरजेचे आहे अशा अनेक बाबी सांगितल्या.
अशा उपक्रमास आमचे नेहमीच सहकार्य राहिल असे महेश रोकडे मुख्याधिकारी यांनी सांगितले. तर महिलांच्या आरोग्यासाठी हा उपक्रम अत्यंत गरजेचा आहे दोन्ही सामाजिक क्लब व डॉ. इनामदार यांनी संयुक्त रित्या असे उपक्रम सातत्याने राबवावेत असेही त्यांनी सुचवले. सीमा परिचारक यांनी कॅन्सर तज्ञ डॉ. इनामदार यांनी केलेल्या मार्गदर्शनाबाबत कृतज्ञता व्यक्त केली.सर्वच स्त्रियांनी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपली जीवनशैली ठेवावी, काळजी घ्यावी, जागरूक राहावे असे मत व्यक्त केले.
याच ठिकाणी सर्व महिलांनी व क्लब सदस्यांनी सीमा परिचारक यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना आटोग्यदायी भावी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या शिबिरामध्ये 65 स्त्रियांची पॅप स्मियर व थर्मल स्कॅन तपासणी करण्यात आली.
या शिबिरासाठी संतोष कसबे,व्यवस्थापक, DAY- NULM पंढरपूर नगर परिषद यांचे सहकार्य लाभले.तर लायन अध्यक्ष डॉ. मंदार सोनवणे, सचिव लायन कृत्तांजली सावंत,प्रकल्प प्रमुख ला. डॉ. प्रेरणा देवकते,ला. संध्या खिस्ते, ला. स्मिता अधटराव, ला. डॉ. स्नेहल मोहिते रोटरी अध्यक्ष रो डॉ. वैभव सादिगले,सचिव रो. मयूर परिचारक प्रकल्प प्रमुख रो. डॉ. संगिता पाटील, रो. शुभांगी शिंदे उपस्थित होत्या.
यावेळी वैष्णवी मलपे , अनिता ढवळे, अर्चना शिंदे, प्रियांका तारापूरकर या सर्व नगरसेविका, अनिता पवार समाजसेविका व त्यांच्या सोबत अनेक महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन प्रशासक ला. ललिता कोळवले यांनी केले तर आभार रो. डॉ. संगिता पाटील यांनी व्यक्त केले.


