पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सोलापूर व तालुका ग्रंथालय संघ, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'सोलापूर ग्रंथोत्सव २०२५' चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. १४ मार्च आणि रविवार, दि. १५ मार्च २०२६ रोजी रखुमाई सभागृह, नवीन बसस्थानकासमोर, पंढरपूर येथे हा ग्रंथ सोहळा संपन्न होणार आहे.
प्रमुख उपस्थिती आणि उद्घाटन या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन आणि विविध सत्रांसाठी राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री ना. श्री. गिरीश महाजन यांच्यासह खा. ओमराजे निंबाळकर, खा. धैर्यशील मोहिते-पाटील, आ. समाधान आवताडे, माजी प्रशांत परिचारक, आणि आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुलदीप जंगम यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
ग्रंथदिंडी आणि सांस्कृतिक कार्यक्रम
शनिवारी सकाळी ९:३० वाजता नगराध्यक्ष सौ. प्रणिता भालके यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करून सुरू होईल. यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सचिन इथापे हे अध्यक्षस्थानी असतील.
दोन दिवसांच्या या महोत्सवात: परिसंवादात डॉ. रमेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 'मराठी भाषा संवर्धन' यावर चर्चा होईल. कवि संमेलन: शिवाजी बंडगर यांच्या अध्यक्षतेखाली रंगणार आहे.
नटसम्राट एकपात्री: फूलचंद गांगर्डे यांचा प्रयोग सादर होईल. कथाकथन: राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन संपन्न होईल.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील सं. हुसे, अध्यक्ष श्रीमती श्वेता गोखले, सचिन जगताप, सुनील सोनटक्के, जोतिराम गायकवाड आणि साहेबराव शिंदे. प्रकाश शिंदे, किशोर गायकवाड, गुरुनाथ गोमिदे, दत्तात्रय मोरे आणि धोडीराम जेऊरकर यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील विविध ग्रंथालयांचे ग्रंथपाल परिश्रम घेत आहेत.
या ग्रंथोत्सवात मोठ्या संख्येने पुस्तक प्रदर्शनी आणि विक्रीचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. तरी सोलापूर जिल्ह्यातील वाचक, विद्यार्थी आणि नागरिकांनी या 'अक्षरांच्या वारीत' सहभागी व्हावे,असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

