पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
1906 हजार रोजी स्थापना झालेल्या बँक ऑफ इंडिया ११८ वा वर्धापन दिन साजरा बँकांच्या शाखातून साजरा होत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे देशाच्या सर्वांगीण विकासात बँक ऑफ इंडिया या बँकेचा मोलाचा वाटा आहे ग्राहकांना चांगली सेवा सुविधा आजच्या वाटचालीतील मुख्य भाग आहे त्यामुळे बँकेच्या प्रगतीमध्ये आपला सर्वांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे हे विसरता येणार नाही सोलापूर जिल्ह्यातील लीड अर्थात अग्रणी बँक म्हणून काम करते ही गौरवाची बाब आहे यापुढे आपल्या बँकेमार्फत ग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा उपलब्ध होईल याबद्दल खात्री आहे असे मनोगत अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका संघटक महेश भोसले यांनी व्यक्त केले.
प्रारंभी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन महिला ग्राहक सोनाली घाडगे जिजामाता स्वयं सहाय्यता बचत गट शिरगाव यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर दीप प्रज्वलन बँकेचे शाखा अधिकारी ताराचंद निमजे यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्राहकांना ग्राहक पंचायतीची माहिती देण्यात आली तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायत वतीने काढण्यात आलेल्या ग्राहक प्रबोधन पुस्तिका व पुष्पगुच्छ देऊन शाखाधिकारी ताराचंद निमजे यांचा सत्कार अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष नंदकुमार देशपांडे यांनी देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला बँकेचे कर्मचारी ग्राहक बचत गटाच्या महिला भगिनी उपस्थित होत्या. कर्मचाऱ्यांचा सत्कार गुलाब पुष्प देऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा सचिव सुहास निकते यांनी केला तर बँकेचे सह शाखाधिकारी दत्तात्रय साळुंखे यांनी बँकेच्या वतीने सर्वांना शुभेच्छा दिल्या आभार शाखाधिकारी ताराचंद निमजे यांनी मांडले.
जिल्ह्याच्या वतीने बँकेला अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरदास जिल्हा संघटक दीपक इरकल कोषाध्यक्ष विनोद भरते तालुकाध्यक्ष विनय उपाध्ये अण्णा ऐतवाडकर आदींनी जिल्ह्याच्या वतीने व तालुक्याच्या वतीने शुभेच्छा दिल्या.