सातारा प्रतिनिधी
अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य यांची श्री शेत्र पंढरपूर येथे त्रैमासिक मीटिंग 22 राज्य व पश्चिम महाराष्ट्र सांगली सातारा सोलापूर वाई महाबळेश्वर पाचगणी वडूज सिंधुदुर्ग व अनेक तालुके यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
त्या समाजाच्या मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष महेश ढवळेव राष्ट्रीय अध्यक्ष दिल्ली नारायणराव पाथरकर व सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष संजय हिरवे,मनोज भांडारकर, संतोष मुळे,महादेव खटावकर, कैलास धोकटे यांच्या उपस्थितीत व अनेक ठराव करण्यात आले व महाराष्ट्रराज्य दरबारी मागण्या करण्यात आल्या
जिल्हा कार्यकारणी व सर्व तालुका कार्यकारणी यांच्या नियुक्ती करण्यासाठी सातारा जिल्ह्यातून जास्त जास्तकार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सातारा जिल्हा कार्याध्यक्ष गजानन फुटाणे व सचिव यशवंत नाझरे महिला अध्यक्ष शारदाताई भस्मे वडूज व पाटण तालुका अध्यक्ष मंगेश शेठ खटावकर पाटण व उपाध्यक्ष किशोर हिरवे मोरगिरी व प्रसिद्धीप्रमुख मल्हार पेठ योगेश हिरवे अशा अनेक सदस्यांच्या नियुक्तीपत्र देऊन त्यांना मार्गदर्शन करताना समाज संघटन व समाजकार्यासाठी आपले योगदान करण्यासाठी संस्थेची ध्येय धोरणे तळागाळात राबवून सभासद करण्याचे सूचना करण्यात आल्या व अजून अनेक ठिकाणी तालुका कार्यकारणी करण्यासाठी प्रयत्नशील राहणे व सर्वांना सामावून घेण्यासाठी नामदेव शिंपी समाजाचा लोकांना मार्गदर्शन करणे अशा अनेक जबाबदाऱ्या देण्यात आल्या उपस्थितीत नरेश खांडके अनिल विकास ढवळे नामदेव नाजरे सिव्हिल इंजिनिअर पाटण व अनेक जण पाटण तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते सर्वांचे जिल्हाध्यक्ष स्वागत व आभार व्यक्त केले.