पंढरपूर प्रतिनिधी
डॉ. हरी कृष्णा भोसले यांना, राष्ट्रीय आरोग्य दूत पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदरचा पुरस्कार, डॉ ज्योतीताई शेटे ( अध्यक्ष - महाराष्ट्र निसर्गोपचार तज्ञ परिषद) यांचे हस्ते, सोलापूर चे खासदार, डॉ. सिध्देश्वर महास्वामिजी यांचे उपस्थिती मद्ये देण्यात आला.सोलापूर - अक्कलकोट रोड वर वळसंग वाडा, निसर्ग विहार, येथे हा कार्यक्रम पार पडला.
महाराष्ट्र राज्य व भारत देशभरात निसर्गोपचार या आरोग्य क्षेत्रा मद्ये निरंतर सेवादान - योगदान, समर्पण या बद्दल हा पुरस्कार दिला जात आहे
आरोग्यम् भारत, सी. एन. इ. टी., एस. एन.ओ., एन.डी.ए.व सोलापूर नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन सोलापूर, यांचे संयुक्त अभियाना अंतर्गत,या वर्षाचा दिला जाणारा, "राष्ट्रीय आरोग्य दूत पुरस्कार: 2023-24, देऊन डॉ हरी भोसले सर यांना गौरविण्यात आले.
यावेळी महारष्ट्र व देशभरातील निसर्गोपचार तज्ञ डॉक्टरांना आरोग्य दूत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी SNO - SOLAPUR व आरोग्यम् भारत अंतर्गत CNET PROGRAM तसेच राष्र्टीय पूरस्कार सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे सोलापुर महानगरपालिकेचे आरोग्य उपअभियंता नीलकंठ मठपती उपस्थित होते.
तसेच या प्रसंगी मा. श्री. योगीन गुर्जर , मा. डाॅ. क्रांतीवीर महिंद्रकर आणि SNO चे अध्यक्ष डाॅ. श्रीकांत सर, सामाजिक वनिकरण विभागाचे मुख्य लेखपाल व राष्ट्रीय टेनिस खेळाडू सिलव्हर मेडल विजेत्या संध्यारांनी बंडगर व सर्व निसर्ग उपचार तज्ज्ञ, डॉकटर , समाजसेवक पदाधिकारी उपस्थित होते.