पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर येथे अखिल भारतीय नामदेव क्षत्रीय महासंघ नवी दिल्ली, शाखा महाराष्ट्र राज्य यांचा सर्वसाधारण सभेत पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हयाचे अध्यक्ष पदी राजेश धोकटे यांना देण्यात आले.
संत शिरोमणी श्री. नामदेव महाराजाचे १६ वे वंशज ह. भ. प. मुकुंद महाराज नामदास तसेच महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष ( राज्यमंत्री दर्जाचे ) तथा अखिल भारतीय नामदेव क्षत्रीय महासंघ नवी दिल्ली, शाखा महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष महेश ढवळे यांचा हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
पंढरपूर येथे अखिल भारतीय नामदेव क्षत्रीय महासंघ नवी दिल्ली, शाखा महाराष्ट्र राज्य यांची पहिली सर्वसाधारण सभा दिनांक ०३ सप्टेंबर रविवार रोजी सकाळी १० ते ०५ या वेळेत योगा भवन पंढरपुर येथे आयोजित करण्यात आली होती. तेथे भारतातील १५ राज्यांतून प्रतिनिधी मोठ्या संख्येत उपस्थित होते. त्या सभेत अखिल भारतीय नामदेव क्षत्रीय महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नारायणराव पाथरकर , मुख्यसचिव जयसिंगपुर येथील महादेवराव खटावकर , महाराष्ट्र राज्य संघटक जळगाव येथील मनोज भांडारकर तसेच ओरीसा बंगाल येथून महेंद्र दर्जी , उत्तराखंड येथून राकेश आर्य , हरिद्वार हरियाणा येथून मुकेशजी नामदेव , मध्य प्रदेश येथून अरुण नामदेव, चेन्नई येथून महेंद्र तांडी, सुरत गुजरात येथून रमेश परमार , गोवा येथून रमेश भीमे , एस एस टोनी, श्रीमंती रेखा वर्मा , बलजीतसिंग खुरपा, राजपाल जी, अनिल गचके, नंदकुमार कोडनुसार, दिनकर पतंगे, कैलास धोकटे , संतोष मुळे, राजेंद्र धोकटे, गणेश उंडाळे आदि मान्यवर उपस्थिती महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्हाचे अध्यक्ष पदाची जबाबदारी राजेश धोकटे यांना दिली.
महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष एन. जी. पाथरकर म्हणाले की, आपल्या मध्ये असलेले संस्कार, नम्रता, शिंपी समाज आणि संत नामदेव महाराज यांच्या प्रती असलेली श्रद्धा, आपल्याकडील संघटन कौशल्य आणि सामाजिक प्रश्नांची जाण तसेच आपण समाजात करीत असलेल्या समाजोपयोगी कामाचा विचार करुन आपल्या या गुणांचा संपुर्ण महाराष्ट्रतील तसेच आपल्या जिल्हातील, तालुक्यातील, शहरातील शिंपी समाजाच्या एकतेसाठी उपयोग व्हावा यासाठी आपली अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ, शाखा महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे. आपले मन. पुर्वक अभिनंदन व आपल्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी राजेश धोकटे म्हणाले,सोलापूर जिल्ह्यातील शिंपी समाज बांधवांना सोबत घेऊन लवकरच कार्यकारणी केली .आणि युवक ,महिला याना व्यवसाय करिता शासनाच्या विविध योजना, कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.सगळ्यांना एकत्र करून ,विश्वासात घेऊन कामे केली जातील.
यावेळी यावेळी अध्यक्ष गणेश उंडाळे, जगन्नाथ म्हैंदरकर, दिलीप बंगाळे, दत्ता चांडोले, प्रसाद निकते, युवक संघटनेचे अध्यक्ष शैलेश धट, महेश गाणमोटे, माजी अध्यक्ष राजेश कपडेकर, ज्ञानेश्वर वडे, प्रथमेश परंडकर, दत्तप्रसाद निपाणकार, अक्षय चांडोले, अमर जंवजाळ, निलेश घोकटे, पत्रकार प्रशांत माळवदे, अनिल जवंजाळ, शिवकुमार भावलेकर आदि मान्यवर उपस्थित होते.