सोलापूर प्रतिनिधी
सिंहगड पब्लिक स्कूलचा क्रीडा क्षेत्रामध्ये चांगल्या कामगिरीचा आलेख वाढतच चालला आहे याचे उदाहरण म्हणजे दि.7 सप्टेंबर 2023 रोजी राजीव गांधी स्टेडियम सोलापूर येथे झालेल्या 17 वर्षाखालील मुलांच्या जिल्हास्तरीय शालेय रोल बॉल स्पर्धेमध्ये सिंहगड पब्लिक स्कूल ने चांगली कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकावला.
सदर संघ विभागीय स्पर्धेसाठी पात्र झालेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री संजय नवले यांचे प्रोत्साहन लाभले तसेच शाळेच्या प्राचार्या निखत शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व विजयी खेळाडूंना क्रीडा शिक्षिका स्वप्नजा आराध्ये, सीमा मादगुंडी, प्रशांत जाधव व अजित कट्टे यांचे मार्गदर्शन लाभले.