रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा
बारामती प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस , महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार , श्रीकांत फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री कार्यालयाचे OSD मंगेश चिवटे मुख्यमंत्री कार्यालयाचे कक्ष प्रमुख राम हरी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वरील पेशंटचे नाव जयसिंग गावडे राहणार गुणवडी तालुका बारामती जिल्हा पुणे 78 वर्ष यांना शेतामध्ये काम करत असताना छातीमध्ये श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.
त्यामध्ये पेशंटच्या नातेवाईकांनी त्यांना नजीकच्या दवाखान्यात दाखल केले असता तेथील डॉक्टरने तपासणी केली असता त्यांना पुढील उपचारासाठी बारामती येथे जाण्यास सांगितले परंतु पेशंटच्या आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याकारणाने त्यांना ते शक्य नव्हते त्यातच त्यांना सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे उपजिल्हा समन्वयक सतीश महादेव गावडे यांच्याशी त्यांनी 98 500 202 74 या फोनवरती संपर्क केला असता त्यांनी तात्काळ तेथील खाजगी दवाखान्यात घेऊन पेशंटला ताबडतोब खाजगी ॲम्बुलन्स मधून बारामती हॉस्पिटल येथे ऍडमिट केले. तेथे त्यांच्यावरती सोनोग्राफी व इतर टेस्ट केले असता पेशंटच्या पोटामध्ये अन्ननलिका ब्लॉक होण्याच्या मार्गावर आले असता असे रिपोर्ट मध्ये आहे असे समजले व तेथील तज्ञ डॉक्टरांनी त्यांच्यावरती उपचार सुरु केले आता ते पेशंट एकदम ठणठणीत आहे.
त्यामुळे वरील पेशंटच्या नातेवाईकांनी वरील सर्व मान्यवरांचे व तात्काळ व वेळेत मदत करणारे गोरगरिबांचे कैवारी दिन दुबळ्यांचा आधार व पुणे जिल्हा उप शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख सतीश गावडे व बारामतीतील शिवसेना वैद्यकीय सर्व पदाधिकारी व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या सर्व महिला आघाडी पदाधिकारी यांचे पेशंटच्या नातेवाईकांनी खूप खूप आभार मानले.