पालकांचा, मातांचा उदंड उत्साहात प्रतिसाद
करकंब प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती (बार्डी) केंद्र पांढरेवाडी शाळेमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी विविध उपक्रमांतर्गत आज "बाजार डे" आयोजन करण्यात आले होते.
सुरवातीला उपसरपंच अभिजित भैय्या कवडे, ग्रामपंचायत सदस्य कल्याण कवडे, सुदामती माळी,अध्यक्ष दीपक वसेकर, उपाध्यक्ष नितीन वसेकर, उषाताई वसेकर,पोलीस पाटील एड.नानासाहेब शिंदे,माजी अध्यक्ष बिभिषण वसेकर अरुण माळी,तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर वसेकर,कांतीलाल वसेकर नामदेव माळी, भानुदास शिंदे साहेब, हणमंत वसेकर,लक्ष्मण कवडे,विनोद वसेकर, गोरख वसेकर,कैलास वसेकर,सावता वसेकर, लक्ष्मण वसेकर,बाळकृष्ण टेके,अशोक माळी साहेब,रमेश वसेकर, सावता वसेकर,सुनिल वसेकर सुनिल अडगळे,ब्रह्मदेव वसेकर, राजेंद्र कवडे,मुख्याध्यापक किरण ढोबळे सहशिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे, अंगणवाडी सेविका शालन खारे,यांच्या उपस्थितीत महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार शाळेच्या वतीने मुलांनी तयार केलेला बुके देऊन करण्यात आला,त्यावेळी मनोगतात अभिजित कवडे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती ही शाळा बार्डी गावची भागशाळा आहे,परंतू या शाळेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नियमित विविध उपक्रम राबवून शाळा जिल्ह्यात नावारूपाला आणली असून या शाळेसाठी भविष्यकाळात अभ्यासिकेसाठी आणि व्यायामासाठी जीम देण्यासाठी प्रस्ताव दाखल केला असून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचे अभिवचन दिले.
यावेळी रामभाऊ कवडे, भानुदास शिंदे यांनी मनोगत सादर करताना शाळेचं कौतुक केले,आणि बाजारातील विविध वस्तू खरेदी करण्यासाठी पालकांची,महिलांची,एकच झुंबड उडाली,बटाटी,भेळ, पाणीपूरी, समोसा,वडे,भोपळा, सफरचंद,काकडी, टोमॅटो,शालेय साहित्य,दोडका, कांदे, कोथिंबीर,वांगी,भेंडी,मेथी,अशा वैविध्यपूर्ण वस्तू विद्यार्थ्यांनी बाजारात आणल्या होत्या, पालकांनी त्याला उदंड उत्साहात प्रतिसाद देत सर्व वस्तू खरेदी केल्या, नफा तोटा,ही संकल्पना दृढ व्हावी, पैशाची मोजणी करता यावी, यासाठी बाजार डे चे आयोजन करण्यात आले होते,वस्तू विकल्यावर जास्त पैसे मिळाल्याचा आनंद प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर झळकत होता.
या छोट्या वस्तीवरील भरलेल्या बाजारात जवळपास १४ते १५हजार रुपयांची उलाढाल झाली,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाफळकरवस्ती वरील सर्व पदाधिकारी,पालक, आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष नितीन वसेकर यांनी मानले.