सोलापूर प्रतिनिधी
लायन्स इंटरनॅशनल क्लब अंतर्गत लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटी समाजसेवी या संस्थेच्या अध्यक्षपदी लायन मोहन शंकरसा भूमकर यांची एकमताने निवड करण्यात आली.सचिवपदी लायन डॉ श्रीकांत शॄंगारपुरे तर, खजिनदार पदी लायन डॉ माधुरी अवसेकर, प्रथम उप्पाध्यक्ष पदी लायन राजन शहा यांची संचालक मंडळाच्या मिंटिग मध्ये निवड करण्यात आली. मोहन भूमकर हे गेल्या ३५ वर्षांपासून लायन्स क्लबमध्ये कार्यरत आहेत.
या काळात त्यांनी झोन चेअरमन, लिडरशीप चेअरमन, कॅबिनेट ऑफिसर तसेच माजी अध्यक्ष आदी पदांवर काम केले आहे. त्यांचे भुमकर रेडिमेड ड्रेसेस चे व्यवसाय आहे. सोलापूर जिल्हा तायक्वॉदो स्पोर्टस् कौन्सिलचे अध्यक्ष, हरिओम विणकर बाग सुप्रभात मंडळ, गुरुविद्या प्रतिष्ठानचे सल्लागार आहेत. विविध संस्थेवर कार्यरत आहेत.