सोलापूर प्रतिनिधी
शासनाने यावर्षापासून पहिली ते दहावी पर्यंत स्काऊट गाईड विषय अनिवार्य केल्याने शाळा तिथे स्काऊट गाईड उपक्रम प्रभावीपणे राबविणार असल्याचे प्रतिपादन प्राथमिक शिक्षणाधिकारी तथा जिल्हा मुख्य स्काऊट गाईड आयुक्त संजय जावीर यांनी केले.
सोमवारी,सोलापूर भारत स्काऊटस् आणि गाईडने शहर जिल्हा संस्थेची कार्यकारी मंडळाची सभा पार पडली. त्याप्रसंगी जावीर बोलत होते. सभेस माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, मुख्यालय आयुक्त स्काऊट विद्याधर जगताप, दक्षिणचे गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, पंढरपूरचे गटशिक्षणाधिकारी लिगाडे, करमाळ्याचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, गाईड मुख्यालय आयुक्त स्वाती स्वामी, जिल्हा चिटणीस गोदावरी राठोड, जिल्हा सहचिटणीस दत्तात्रय गाजरे यांच्यासह ११ तालुक्यातील विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख,मुख्याध्यापक तसेच जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काऊट शंकरराव यादव, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड सुलक्षणा लोखंडे, लीडर ट्रेलर खुर्शीद शेख आदी उपस्थित होते.
पुढे शिक्षणाधिकारी जावीर यांनी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे कब-बुलबुल, स्काऊट-गाईड आणि रोव्हर रेंजरची युनिट नोंदणी करुन घेण्याचे आवाहन केले.
यावेळी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील शिक्षकांसाठी आयोजित निबंध स्पर्धेतील गुणवंत शिक्षकांचा स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
प्रथम क्रमांक- अनिल यादव ( जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरड ता. करमाळा), द्वितीय क्रमांक- पांडुरंग कुंभार ( एस.व्ही.सी. एस.हायस्कूल बोरामणी ता. दक्षिण सोलापूर) व अनिता गायकवाड (राजश्री शाहू विद्यालय सोलापूर), तृतीय क्रमांक- नर्मदा कणकी ( नू.म.वि. प्राथमिक शाळा रेल्वे लाईन सोलापूर) तर उत्तेजनार्थ- यशवंत गपाट ( जिजामाता कन्या प्रशाला बार्शी ) व मयुरेश कुलकर्णी ( जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होनमाने वस्ती आष्टी ता. मोहोळ ) यांच्यासह सेवानिवृत्त स्काऊटर विस्तार अधिकारी अशोक भांजे, हर्षवर्धन नाचणे व मुख्याध्यापक महादेव पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
या सभेत जिल्हा मेळावा, तालुका एक दिवसीय निसर्ग निवास कँम्प,नोंदणी कँम्प व उजळणी वर्ग तसेच शिक्षकांसाठी अँडव्हान्स प्रगत प्रशिक्षण, प्राथमिक प्रशिक्षण आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. सभेचे सूत्रसंचालन जिल्हा स्काऊट संघटक श्रीधर मोरे यांनी केले तर जिल्हा गाईड संघटक अनुसया सिरसाठ यांनी आभार मानले.सभा यशस्वी होण्यासाठी कार्यालयीन कर्मचारी विश्वास लिंगराज, रिजवाना पठाण, बंडू बंडगर व रोवर्स यांनी परिश्रम घेतले.