मारापूर प्रतिनिधी
मारापूर विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्या.मारापूर या सहकार व अर्थ दालनाच्या नूतन चेअरमन पदी लोकनियुक्त सरपंच विनायकराव यादव यांचे निकटवर्तीय व विश्वासू सहकारी राजकुमार यादव यांची तर व्हा. चेअरमन म्हणून अमोल जानकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळींच्या वतीने त्यांचा अभिनंदन पर सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा व आनंद व्यक्त करण्यात आला.
पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्राचे लोकप्रिय आमदार समाधान आवताडे यांच्या सामाजिक व राजकीय सेवाभावी कार्य पटलावरील सर्वसमावेशक तसेच विकासात्मक बाबींच्या वाटेवर राहून सर्वसामान्यांच्या आर्थिक हिताला व गाव पातळीवरील सहकार समृद्धीला सक्षम आणि मजबूत करण्यासाठी आपल्या पदाचा आणि अधिकाराचा वापर करुन आपली निवड सार्थ ठरवा असा कार्यमंत्र श्री.यादव नूतन चेअरमन, व्हा. चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांना दिला. यावेळी मारापूर ग्रामपंचायतच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी भगवानराव आण्णा आसबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,संचालक व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.