भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील तलाठी कार्यालयात महसूल सप्ताहाचा शुभारंभ अप्पर तहसीलदार तुषार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी भगवान चौगुले ,हरिभाऊ शिंदे ,दिलीप भानवसे,सरपंच राजकुमार पाटील,नितीन शिंदे,विठ्ठल चौगुले,जयराम शिंदे,मंडळ अधिकारी राजेंद्र शिंदे,तलाठी प्रशांत शिंदे,भोजलिंग बाबर,हरिदास चौगुले,मधुकर गायकवाड ,कुंडलिक शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी तुषार शिंदे म्हणाले की, राज्य सरकारच्या वतीने महसूल शब्दाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी या सप्ताहाच्या माध्यमातून युवा संवाद, एक हात मदतीचा, जनसंवाद, सैनिक हो तुमच्यासाठी, महसूल विभागातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद असे अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत. तरी ग्रामस्थांनी या महसूल सप्ताहाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.
यावेळी शालेय विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप,
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी व्यंकटेश महाजन, कोतवाल लक्ष्मण गायकवाड, गणेश मदने, गणेश भानवसे, आर के पवार यांनी प्रयत्न केला.यावेळी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.