पंढरपर प्रतिनिधी
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणावर एक दिवशीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले हे आयोजन कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विभागीय केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या एक दिवशीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च शिक्षण सल्लागार डॉ. अधिकराव जाधव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत खिलारे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या शैक्षणिक धोरणात कोणकोणते बदल करण्यात आलेले आहे. याची सविस्तर माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य तथा प्रमुख पाहुणेडॉ . चंद्रकांत खिलारे यांनी सोलापूर जिल्ह्यातून आलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या समन्वयक, समंत्रक यांना नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती दिली.
नवीन शैक्षणिक धोरण 2020 बद्दल सांगत असताना डॉ. चंद्रकांत खिलारे म्हणाले भारत हा जगातील सर्वात तरुणांची संख्या जास्त असणारा देश आहे या तरुणांच्या हातांना काम देण्यासाठी व त्यांना स्वावलंबी बनण्यासाठी त्यांच्यात असणाऱ्या वेगवेगळ्या कौशल्यला विकसित करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाची चांगल्या प्रकारे मदत होऊ शकते. नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची सीमा नाही. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण विद्यार्थी कोणत्याही आवडीच्या विषयातून पूर्ण करू शकेल, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत खिलारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ शिक्षण सल्लागार डॉ. अधिकराव जाधव आपले अध्यक्ष मनोगतात म्हणाले विद्यार्थ्यांची अंगी कौशल्य विकसित झाली पाहिजे, कौशल्याच्या आधारे विद्यार्थ्यांनी आपल्या मध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या कौशल्यात आवड निर्माण करून आपले पुढील शिक्षण घ्यावे व त्या कौशल्यावर आधारित करिअरची संधी त्यांनी शोधावी.
याविषयी डॉक्टर अधिकराव जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात वेगवेगळे मुद्दे स्पष्ट केले. विभागीय केंद्र पुणे समन्वयक संतोष वामन, चला विभागाचे उपप्राचार्य डॉ. नाईकनवरे, सायन्स विभागाचे उपप्राचार्य डॉ.कवडे सर डॉ. बळवंत डॉ.समाधान मने, डॉ. अमर कांबळे, डॉ अनंतकवळस ,संजय मुळे व अनेक महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे समन्वयक, समंत्रण व महाविद्यालयातील प्राध्यापक, सेवक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक केंद्राचे समन्वयक डॉ. रविराज कांबळे यांनी केले प्रमुख पाहुण्यांचा व अध्यक्ष चा परिचय प्रा. संतोष ढोले यांनी करून दिला सूत्रसंचालन प्राध्यापक संतोष मते यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक दत्ता खिलारे यांनी मानले