मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
महाराष्ट्र विद्या विकास मंडळ नेहरूनगर कुर्ला ( पूर्व ) मुंबई ४०००२४ संचलित शां.कृ. पंतवालावलकर माध्यमिक विद्यालय कुर्ला या शाळेच्या स्व.सौ.स्मिता द. सामंत विविधलक्षी सभागृहामध्ये मंगळवार दिनांक १ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११.०० वा.सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा ' सेवा गौरव शुभेच्छा समारंभ ' संपन्न झाला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र सामंत ,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव सत्येन्द्र सामंत होते.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक महादेव यादव , धुळाजी दडस,उपमुख्याध्यापिका ज्योती नेमाडे, पर्यवेक्षक पाटीलबुबा पाचारणे, सतीश शिंदे, श्रीम. स्मिता कर्पे, सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे सहाय्यक शिक्षक उद्धव अमुप यांनी केले.
संस्थेच्या व शाळेच्या वतीने सहाय्यक शिक्षिका श्रीम.दीपा मानगावकर, श्रीम.ज्योस्त्ना कटारनावरे व चतुर्थ श्रेणी कर्मचारी काशिनाथ सुपे यांना शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ,सन्मानचिन्ह व उभयतांना पूर्ण पोषख देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी शिक्षक,मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक,प्रमुख अतिथी,कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतातून सर्व सेवानिवृत्त सहकार्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा.शिक्षिका योगिता हिरवे यांनी केले.सहाय्यक शिक्षक पांडे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.